मंत्रालयात शेतकऱ्याचा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी मंत्रालयात विषप्राशन करून आपले जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यात मंत्रालयातील पोलिसांना शुक्रवारी यश आले. 

मारुती सदाशिव धावरे (वय 28, रा. सांगवी, जि. सोलापूर) हा तरुण शेतकरी मंत्रालयात प्रवेश करताना त्याची पोलिसांनी त्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्याकडे कीटकनाशक आढळल्याने ते त्वरित ताब्यात घेतले व धावरेची चौकशी केली.

शेतातील ऊस घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातील उभे पीक जाळावे लागते. या संदर्भात सरकारी यंत्रणेकडे दाद मागूनही त्याची समस्या न सुटल्याने त्याने मंत्रालयातही अनेकदा खेटे घातले; पण काहीच मार्ग न निघाल्याने धावरेने अखेर धर्मा पाटील यांच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र पोलिसांनी झडती घेऊन कीटकनाशक ताब्यात घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

Web Title: marathi news mumbai news Devendra Fadnavis Dharma Patil Suicide