भारत जगातील नंबर एक अर्थव्यवस्था बनू शकते : मुख्यमंत्री 

File photo of Devendra Fadnavis
File photo of Devendra Fadnavis

मुंबई : भारत जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू शकते आणि त्यासाठी तुम्ही विद्यार्थी ताकद बनू शकता, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास व सातत्यपूर्ण प्रयत्न याकडे लक्ष देण्याचे, तसेच मानसिकता बदलून प्रयोगशील राहण्याचे आवाहन केले.

'सोच बदलोगे, तो भारत बदलेगा' असे त्यांनी सांगितले. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या खासगी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या 'शिक्षण ते उद्योजकता' या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, 'भारत 2020 मध्ये जगातील सर्वांत तरुण देश बनत आहे; परंतु युवा लोकसंख्या आणि मानव संसाधन यामध्ये फरक आहे. लोकसंख्येत कुणाचाही समावेश असू शकतो; परंतु मानव संसाधनामध्ये रोजगारासाठी आवश्‍यक असलेल्या कुशल मनुष्यबळाचा समावेश होतो. त्यामुळे देशाला प्रस्थापित करण्यासाठी भारताने जगाच्या गरजा समजून घेण्याची गरज आहे. जगाला भारतात संधी दिसतात; पण त्या आपल्याला दिसतात का? याचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे.' 

ते पुढे म्हणाले, आपल्याला जॉब सीकर नाही; तर जॉब क्रिएटर व्हायचे आहे. तशी मानसिकता युवकांच्या मनात रुजवायची आहे. जग वेगाने बदलत आहे आणि ती दिशा समजून घेण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाने क्रांती केली असून, डिजिटल तंत्रज्ञानाने कल्पनाशक्ती जिथपर्यंत पोहोचू शकते ते साध्य करण्याची ताकद दिली आहे. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकताही आली आहे. सरकारने स्टॅण्डअप, स्टार्ट अप व प्रधानमंत्री मुद्रा यांसारख्या योजना त्यासाठी आणल्या आहेत. 

सरकारने मुद्रा योजनेतून 10 कोटी लोकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज वितरित केले आहे आणि त्यात सात कोटी महिला आहेत. तसेच अल्पसंख्याक समाजातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्यात आल्या आहेत. 

जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत तयार आहे. आवश्‍यकता आहे ती गरजांचा शोध घेऊन प्रयोगशील राहण्याची, असेही ते म्हणाले. सर्व समाजाला विकासाच्या मुख्य धारेत आणून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने सर्वांना समान संधी देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com