डोंबिवली - दिवा परिसरातील खंडित वीज पुरवठा प्रश्न निकाली

संजीत वायंगणकर
शनिवार, 10 मार्च 2018

डोंबिवली : दिवा परिसरात वारंवार भेडासावणारा वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नांतून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारक्षेत्रातील बंदरआळी, दिवा (प.) तसेच बी.आर.नगर, दिवा (पु) येथे 630 के. व्ही. चे नवीन विद्युत जनित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्यात आले असून याचा लोकार्पण सोहळा आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी उप शहरप्रमुख ब्रह्माशेठ पाटील, नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका दिपाली उमेश भगत, विभागप्रमुख उमेश भगत, विभागप्रमुख अरुण म्हात्रे, उप विभागप्रमुख विजय भोईर, भीम पाटील , कैलास भगत, अभिषेक ठाकूर, अनिल भगत, आशिष भोईर, महावितरणचे कनिष्ठ अभियंता सरोदे व उधुगडे आदी मान्यवर व दिवा विभागातील शिवसेना पदाधिकारी तसेच दिवेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी भोईर यांचे आभार मानले. 

Web Title: Marathi news mumbai news dombivali electricity problem solved