कल्याण, विठ्ठलवाडी एसटी डेपोमधून होळीनिमित्त जादा एसटी बससेवा

रविंद्र खरात
बुधवार, 31 जानेवारी 2018

कल्याण : कोकणात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, त्या कालावधीत कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते टिटवाळा आणि डोंबिवली मधून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने यावर्षी ही 25 फेब्रुवारी 2018 ते 1 मार्च 2018 या कालावधीत कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी डेपो मधून विशेष जादा बसेस सोडण्यात येणार असून ऑनलाईन बुकींग करण्यासाठी एसटी डेपोमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे.

एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातील कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी डेपोमधून रत्नागिरी, कासे-माखजन, देवरुख, गुहागर, चिंद्रावळे (गराटेवाडी), चिपळूण, दापोली, पोलादपूर, महाड, कळमणी, ओवळी, दिवेआगार, अंबवडे, कोतवाल, अलिबाग मार्गावर होळीनिमित्त विशेष जादा बसेस सोडण्यात येणार असून रविवार ता. 25 फेब्रुवारी 2018 ते 1 मार्च 2018 पर्यंत तिकीट आरक्षण कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवलीमधील एसटी डेपो मध्ये संगणक यंत्राद्वारे ऑनलाईन देण्याची व्यवस्था केली असून ज्यांना ग्रुप पद्धतीने आपल्या घरापासून जवळच्या चौकातून अथवा शहरातून जाण्याची व्यवस्था केली असून अधिक माहितीसाठी संबंधित डेपोमध्ये संपर्क साधून बुकिंग करावे असे आवाहन कोकण प्रवासी संघटना अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी केले आहे .

Web Title: Marathi news mumbai news extra st kalyan holi