बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करा - प्रकाश पेणकर

रविंद्र खरात
शनिवार, 30 डिसेंबर 2017

कल्याण : रिक्षा बॅच आणि परवान्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून 15 वर्ष स्थानिक वास्तव्य दाखला मिळाविलेल्या 15 वर्षापेक्षा महाराष्ट्र राज्यात कमी वास्तव्य असलेल्या परराज्यातील परप्रांतीय व्यक्तीचे कागदपत्रे फेरतपासणी करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे आणि कल्याण आरटीओकडे केली आहे. 

राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मागेल त्याला रिक्षा परवाना जाहीर केला आहे. त्याला कल्याण आरटीओसहित राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयात चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिक्षा बॅच आणि परवान्यासाठी महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष वास्तव्याचा दाखला देणे बंधनकारक आहे. मात्र 15 वर्षापेक्षा कमी आणि एक दोन वर्षे रहिवासी असताना दलालामार्फत बनावट शाळेचा दाखला, रेशन कार्ड आणि वास्तव्याचे खोटे पुरावे, निनावी कागदपत्रे अवाच्या सव्वा रुपयांच्या आमिषाने सादर करून 15 वर्ष अधिवास स्थानिक वास्तव्य दाखला प्राप्त करून तहसिलदार कार्यालय आणि आरटीओ यांची दिशाभूल करून रिक्षा बॅच व परवाना मिळविल्याचा आरोप रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी केला. या कामात तहसिलदार कार्यालय मधील काही अधिकारी, कर्मचारी  आणि दलाल यांच्या संगनमताने होत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक पेणकर यांनी केल्याने खळबळ माजली आहे. 

वास्ताविक रिक्षा सार्वजनिक वाहतूक वाहन चालक परवानाधारक यांस स्थानिक भाषा ज्ञान शहराचे भौगोलिक माहिती असणे कायदा नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र कल्याण आरटीओ अंतर्गत येणाऱ्या शहरात 15 वर्ष वास्तव्य नसलेल्या नागरीकांना रिक्षा बॅच आणि परवाना मिळाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याने याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी केल्याने एकच खळबळ माजली असून तहसिलदार आणि आरटीओ कार्यालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. 

तहसिलदार कार्यालयामार्फत देणारे दाखले कागदाची पूर्तता पाहूनच दिले जाते, संबंधित संघटनेने सबळ पुरावे दिल्यास तहसिलदार कार्यालयाची दिशाभूल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करू अशी माहिती कल्याण तहसिलदार अमित सानप यांनी दिली.

Web Title: Marathi news mumbai news fake documents auto drivers