सीबीडी बेलापूरात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

दिनेश चिलप मराठे
रविवार, 21 जानेवारी 2018

मुंबई: नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सेक्टर 4 येथे श्री मोरया सार्वजनिक मित्र मंडळाकडून माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाचे हे 8 वे वर्ष असून, येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मंडपात पाच फूटांच्या विलोभनीय आसनस्थ श्री पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.हा उत्सव अडीच दिवस सुरु राहतो.

लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, वेशभूषा, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांमध्ये माघी गणेशोत्सव जल्लोषमय आनंद घेऊन आला. सद्यस्थितीत सुरु असलेला ज्वलंत विषय मुलींना अत्यावश्यक असलेल्या रजस्वला काळातील सॅनिटरी पॅडवरील असलेला 18 टक्के जीएसटी तत्काळ रद्द व्हावा आणि शक्य झाल्यास शाळा, महाविद्यालयातील मुलींना हे पॅडस मोफत मिळावेत अशी मागणी समाजातील विविध घटकांकडून होत आहे.

याच संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील माझगाव येथील जीएसटी कार्यालयात मोर्चा काढून मागणी केली आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष हेमंत काटकर म्हणाले, की मी फार्मासिस्ट असून, प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात शासनाद्वारे मोफत सॅनिटरी वेंडिंग मशिन उपलब्ध करुन द्यावेत. तसेच शालेय मुलींना सॅनिटरी पॅड मोफत द्यावेत, अशी मागणी सरकारकडे श्री मोरया सार्वजनिक मित्र मंडळाकडून करीत आहोत.

अध्यक्ष हेमंत काटकर, राकेश ठाकूर, निखिलेश ठोंबरे, अमोल पवार, आनंद घाडग, मनोज कापरेकर, सनी(नीलेश) कांबळे, रोहिदास जाधव, जयकांत उतेकर, दर्शन आचरेकर, नितेश पटील,धीरज पाटील, विशाल डोहाळे या सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी माघी गणेशोत्सव साजरा करण्याकरिता विशेष मेहनत घेतली.

Web Title: Marathi news Mumbai news ganesh festival belapur