विक्रोळीत 500 किलो गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एएनसी) पथकाने मंगळवारी विक्रोळीत केलेल्या कारवाईदरम्यान तिघांना अटक करून 500 किलो गांजा जप्त केला. हे तिघे नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी आहेत.

मुंबई - अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एएनसी) पथकाने मंगळवारी विक्रोळीत केलेल्या कारवाईदरम्यान तिघांना अटक करून 500 किलो गांजा जप्त केला. हे तिघे नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी आहेत.

नाशिकहून काही व्यक्ती छोट्या टेम्पोतून अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती "एएनसी'च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी पहाटे पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे सापळा रचला होता. तेथे कांदा घेऊन आलेल्या एका टेम्पोची या पथकाने तपासणी केली. टेम्पोमध्ये वर कांद्याच्या गोणी, त्याखाली 500 किलो गांजा लपवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या गांजाची अंदाजे किंमत एक कोटी आठ लाख रुपये आहे. हा गांजा कोणाला देण्यासाठी मुंबईत आणला जात होता, याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: marathi news mumbai news ganja seized crime