मुलगी झाली; खेद नको!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

बेलापूर - ‘बेटी बचाव, बेटी पढाव!’ ‘मुलगा-मुलगी भेद नको’, ‘मुलगी झाली; खेद नको!’, ‘एक नारी सबसे भारी!’ असे फलक घेऊन गुरुवारी (ता. ८) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील महिला डॉक्‍टर व प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी बाईक रॅली काढून जनजागृती केली. नवी मुंबईतील आदित्य हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सोसायटी, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि हिम्पाम डॉक्‍टर संघटना यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन केले होते.

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाशी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक राणी काळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली सुरू झाली. त्यात शिवाजी चौकात पथनाट्यातून जनजागृती केल्यानंतर ‘बेटी बचाव’च्या घोषणा त्यांनी दिल्या. भगवे फेटे आणि हातात फलक घेऊन बाईकवर स्वार होऊन या डॉक्‍टर आणि परिचारिकांनी कोपरखैरणेच्या दिशेने कूच केली. बस थांबा, रिक्षा स्टॅण्ड आणि येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांना शुभेच्छा देत ही रॅली कोपरखैरणेतील नाईक महाविद्यालयात दाखल झाली. या रॅलीच्या समारोपाला महापौर जयवंत सुतार, आदित्य हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे,  प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या संचालिका डॉ. विजया तांबे, हिम्पाम संघटनेचे एम. आर. काटकर, श्रमिक शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश नाईक, नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, मुख्याध्यापक थळे, मुख्याध्यापिका योजना तिगडे, ई-प्रभाग समितीचे सदस्य मारुती सकपाळ आदी उपस्थित होते.

नाईक महाविद्यालयात महिला दिन 
कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ. जी. नाईक महाविद्यालयात महिला विकास कक्ष समितीच्या वतीने गुरुवारी (ता. ८) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सुरेश नाईक, एव्हाना फाऊंडेशनच्या आराधना गवारे, महिला विकास समिती कक्षाच्या प्रमुख प्राध्यापक स्वाती हैलकर, स्मृतिगंधा बिडकर, समिधा पाटील, सीमा शिंदे, संगीता वास्कर, ऊर्मिला रावरिया आदी उपस्थित होते.

अच्युत पालव यांचे आज प्रात्यक्षिक
महिला दिनानिमित्त अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या वतीने भरवण्यात आलेल्या आदिशक्ती अक्षरशक्ती या प्रदर्शनाला विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने उद्या (ता. १०) सायंकाळी ६ वाजता सुलेखनकार अच्युत पालव प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. सुलेखनाबाबत ते या वेळी चर्चाही करणार आहेत. हे प्रदर्शन रविवारीही (ता. ११) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहे.

Web Title: marathi news mumbai news girl baby