गुजरात पर्यटन विभागातर्फे संमेलनासाठी 25 लाख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

बडोदे येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी गुजरात सरकारने 25 लाखांचा निधी जाहीर केला आहे. संमेलनानिमित्ताने गुजरात पर्यटनाची जाहिरात करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 25 लाखांचा निधी जाहीर केला आहे. 

मुंबई : बडोदे येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी गुजरात सरकारने 25 लाखांचा निधी जाहीर केला आहे. संमेलनानिमित्ताने गुजरात पर्यटनाची जाहिरात करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 25 लाखांचा निधी जाहीर केला आहे. 

16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान गुजरातमधील बडोदे येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्‌मय परिषद बडोदे यांनी 50 लाखांची मागणी केली होती. सरकारच्या वतीने दर वर्षी मिळणारा 25 लाखांचा निधी यापूर्वीच आयोजकांकडे सुपूर्द केला आहे; मात्र संमेलनामध्ये होणारा खर्च पाहता स्थानिक राज्य असलेल्या गुजरात सरकारकडेही खर्चाच्या निधीसाठी विचारणा केली होती. त्यानंतर गुजरात पर्यटन विभागाने वाङ्‌मय मंडळाला पत्र लिहून 25 लाखांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली. संमेलनानिमित्ताने गुजरात पर्यटनाची जनजागृती व जाहिरात मंडळाला करावी लागणार आहेत. त्यानंतरच हा निधी मंडळाला सुपूर्द करण्यात येणार आहे. 

यंदाचा संमेलनाचा खर्च हा सव्वा ते दीड कोटीदरम्यान आहे. त्यासाठी सरकारने 25 लाख, गुजरात सरकारने 25 लाख, पी. डी. पाटील यांनी 25 लाख, बॅंक ऑफ बडोदे व अनेक प्रायव्हेट कंपन्यांनी स्पॉन्सरशिप दिल्यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे मराठी वाङ्‌मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी दिली. 

Web Title: Marathi News Mumbai News Gujrat Tourism Allot 25 lacs for Sammelan