ऐतिहासिक मिनारा मस्जिद अनधिकृत बांधकामाच्या विळख्यातून मुक्त

atikraman
atikraman

मुंबादेवी : दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल विभागातील
मेमनवाडा मार्ग, पायधुनी येथील जगप्रसिध्द मिनारा मस्जिद या धार्मिक स्थळाला लगत असलेल्या रस्त्यांवर गेली अनेक वर्षे अनधिकृतपणे ठाण मांडून बसलेल्या विविध व्यावसायिकांच्या अनधिकृत पक्क्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सहाय्यक आयुक्त डॉ. उदयकुमार शिरुरकर यांच्या पथकाने केली.

या कारवाईदरम्यान त्यांच्यासोबत सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे व चंद्रकांत सुर्यवंशी, किरण धस, वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन) विलास पवार, वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) जगदीश केंगळे यांच्यासह 15 कामगार, 1 जेसीबी, 2 अतिक्रमण गाड्या यांच्या सहाय्याने सदर कारवाई करुन 25 ते 30 पक्के अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आणि मेमनवाडा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

पायधुनी क्षेत्रातील मेमनवाडा मार्ग येथील एका इमारतीत सकाळी सहाच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सदर अनधिकृत पक्क्या बांधकामामुळे अग्निशामक दलाच्या बंबांना आग विझविण्याकरीता सदर रस्त्यावर जाण्यास अडचण झाली होती. त्यामुळे सदर बंब त्या ठिकाणी 15 ते 20 मिनीटे अडकून पडल्याचे डॉ.शिरुरकर यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे सदर आग लागल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

अग्निशमक बंबांना आग लागलेल्या ठिकाणी वेळेत पोहचता यावे याकरीता डॉ. उदयकुमार शिरुरकर यांनी कामगारांच्या मदतीने काही अनधिकृत बांधकाम हटविली व अग्निशामक बंब आगीच्या ठिकाणी पोहचून काही वेळात तेथील आग विझविण्यास मदत झाली.

या मार्गावर आग विझविण्याची कारवाई झाल्यावर मेमनवाडा मार्ग या मार्गाचे निरीक्षण केले असता असे दिसून आले की, त्या रस्त्यावर बहुतेक व्यावसायिकांनी अनधिकृत पक्के बांधकाम करुन रस्ता अतिक्रमित केला होता. त्यामुळे अग्निशमाक बंबाच्या गाड्या, रुग्णवाहिका, महापालिकेच्या गाड्या व पोलिसांचे वाहने यांना दैनंदिन कार्य करण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्ष्यात घेता सदर अनधिकृत बांधकामे तोडणे आवश्यक आहे, असे सहाय्यक आयुक्त बी विभाग यांना दिसून आले.

त्या अनुषंगाने डॉ. शिरूरकर यांनी पुढाकार घेऊन सदर मार्गावरील सर्व अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना तात्काळ अतिक्रमणे हटविण्याचे सुचित केले व त्यानुसार त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित त्यांचे माल व साहित्य रिकामे करण्यास सुरवात केली.

त्यानंतर 1 जेसीबी व 25 कामगार यांच्या सहाय्याने अनधिकृत 25 ते 30 दुकाने निष्कासित करुन 6 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. सदर कारवाईमुळे जगप्रसिध्द मीनारा मस्जिद अतिक्रमणमुक्त होऊन त्याचे सौंदर्य पुन्हा खुलले. तसेच मेमनवाडा मार्ग मोकळा झाल्याने स्थानिक रहिवाशांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com