विधानसभेत अपक्ष आमदारांची अवस्था 'ना घरका ना घाटका'

विजय गायकवाड
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई : कधीकाळी अपक्ष आमदारांच्या तालावर सरकार चालवायचे. बहुमतात असलेल्या भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्ये मात्र अपक्ष आमदारांची अवस्था बिकट झाली आहे. राजकीय महत्व सोडा परंतु विधानसभा कामकाजातही आमदारांना संधी मिळत नाही अशी व्यथा अहमदपुर (लातूर) चे आमदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी विधानसभेत व्यक्त केली.

सत्ताधारी आणि विरोधक वाटून चर्चेची संधी घेतात. अपक्षांना वाली कोण? असा सवाल त्यांनी विधानसभेत उपस्थित केला. विनायक पाटील म्हणाले, आम्हा अपक्ष आमदारांची अवस्था 'घर का ना घाटका' अशी झाली आहे. आम्हाला संधी नाही. आम्हाला कोणी विचारत  नाही. आम्ही बाई की गडी आहोत? हे ही  समजत नाही, असे हतबलपणे त्यांनी सांगितले. तालुका अध्यक्ष योगेश सागर यांनी सर्व सदस्यांना समान अधिकार असल्याचे सांगत अपक्षांनाही चर्चेसाठी संधी देऊ असे सांगत चर्चा थांबवली.

Web Title: Marathi news mumbai news independent MLA