इंदू मिलसाठी 15 वर्षे हात कुणी बांधले होते?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 जानेवारी 2018

मुंबई : 'आज जे संविधान बचाव रॅली काढत आहेत, त्यांचे हात कमला मॉलसाठी मिल कामगारांच्या जमिनी देताना वेगाने सरसावले होते. पण, तेच हात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदूमिलची जागा देताना अचानक कसे मंदावतात, हेही या महाराष्ट्राने गेली 15 वर्षे अनुभवले आहे, अशी जोरदार टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

भाजपच्या भव्य तिरंगा एकता रॅलीच्या निमित्ताने कामगार मैदानावरील जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, संविधान स्वत:च सक्षम आहे, त्याला तुम्ही काय वाचविणार? मुळात दुरूपयोग करता येईल, इतके संविधान कच्चे नाही. ज्या ज्या वेळी संविधानावर आघात करण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा तेव्हा संविधानानेच त्यांना दंडित केले. इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे उदाहरण अजूनही लोक विसरले नाहीत. आज ज्यांनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले, त्यासाठी 18 पक्ष एकत्र आले. पण, ते केवळ 1800 लोक जमवू शकले आणि एकट्या भाजपने जेव्हा तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी लोकांना आवाहन केले, तेव्हा कामगारमैदान पहा कसे गच्च भरले आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. संविधान हा आमचा धर्म आहे. आम्ही सत्ता उपभोगायला सरकारमध्ये नाही, तर सेवा करण्यासाठी आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, आज राज्यभरात सुमारे 3000 वर ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा एकता यात्रांचे आयोजन केले होते. 

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news mumbai news Indu Mill Devendra Fadnavis BJP