प्रत्येक उद्योगाला संशोधनाची गरज - व्ही. एन. मगरे

रविंद्र खरात 
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

कल्याण : ‌शिक्षणाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय क्रियाशिलता नाही, क्रियाशिलतेशिवाय कुठलेही संशोधन नाही, प्रत्येक उद्योगाला संशोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे उप कुलगुरु व्ही. एन. मगरे यांनी कल्याण मधील एका कार्यक्रमात केले .

कल्याण पूर्व प्रमोद रामउजागर तिवारी साकेत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शनिवारी (ता. 10) एमबीएच्या संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे उप कुलगुरु व्ही. एन. मगरे यांच्या हस्ते करण्यात आले .

 यावेळी आपल्या भाषणात मगरे म्हणाले की, शिक्षण आणि उद्योग क्षेत्र एकत्र आले पाहिजे. शिक्षणाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय क्रियाशिलता नाही आणि क्रियाशिलते शिवाय संशोधन नाही, प्रत्येक उद्योगाला संशोधनाची गरज आहे, संशोधन तृतीय उद्योगाचा पाया आहे. हे उच्च शिक्षणाशी निगडीत असून त्यापासून ज्ञान प्राप्त होते असे यावेळी मगरे म्हणाले.

या संशोधन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी साकेत ज्ञानपीठ शिक्षण संस्था चेअरमन विनोद तिवारी, सचिव साकेत कुमार, शोभा नायर, सनोद कुमार, प्राचार्य डॉ. एम. के. राजू, प्राचार्य ममता सिंग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या नायर यांनी केले तर कार्यक्रमास विविध कॉलेज प्राचार्य आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
 
Web Title: Marathi news mumbai news industries research