पहिले आंतरराष्ट्रीय बेणे इस्रायल अधिवेशन संपन्न

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई : इस्रायल भारताचा मित्र राष्ट्र म्हणून पुढे आलेला आहे. सैनिकी संसाधनात भारताला मदत मिळतेय. तेथील टेक्नोलॉजी आपण वापरतोय. शस्त्रास्त्रे घेतोय. कोरड वाहू शेतीचे ज्ञान घेण्यासाठी हजारो शेतकरी इस्रायलला जात असतात. यात मोठ्या प्रमाणात तंत्र ज्ञानाची आदान प्रदान होतेय. दोन हजार वर्षांपूर्वी एका जहाजाने प्रवास करताना जहाज फुटले आणि त्यातील काही वाचलेली लोकं आपल्या देशात आली. ती ही इस्रायली ज्यू लोकं भारतात राहून समरस झाली. 

मुंबई : इस्रायल भारताचा मित्र राष्ट्र म्हणून पुढे आलेला आहे. सैनिकी संसाधनात भारताला मदत मिळतेय. तेथील टेक्नोलॉजी आपण वापरतोय. शस्त्रास्त्रे घेतोय. कोरड वाहू शेतीचे ज्ञान घेण्यासाठी हजारो शेतकरी इस्रायलला जात असतात. यात मोठ्या प्रमाणात तंत्र ज्ञानाची आदान प्रदान होतेय. दोन हजार वर्षांपूर्वी एका जहाजाने प्रवास करताना जहाज फुटले आणि त्यातील काही वाचलेली लोकं आपल्या देशात आली. ती ही इस्रायली ज्यू लोकं भारतात राहून समरस झाली. 

इस्राईल लोकांनी महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान दिलेले आहे. त्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. त्यांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यापूर्वी कोण ज्यु आहेत कोण नाही या बाबतीत स्पष्टता निर्माण झाली आणि हा दर्जा दिल्यास त्याचा गैरवापर होणार नाही एवढी काळजी घेतल्यास त्यांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची मागणी मान्य होण्यास काहीच अडचण येणार नाही. असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माझगाव येथील भारतातील इस्रायली समाजाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बेणे इस्रायल अधिवेशनात सकाळला दिलेल्या मुलाखतीत जाहिर केले. 

सोमवारी (ता. 15) माझगाव येथील सर एलीकदुरी हायस्कूलच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय बेणे इस्रायल अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीपूर्ण भारत भेटीची पार्श्वभूमी या अधिवेशनाला होती. हे अधिवेशन एक इस्रायली समुदायाचा समारंभ असल्याने काही इस्रायली कलाकारांनी विविध हिंदी आणि इंग्लिश गाण्यांवर नृत्य सादर करीत भारत इस्रायल मैत्रीचे दर्शन उपस्थितांना घडविले. इस्रायली ज्यु धर्मियांच्या पहिल्याच अधिवेशना करिता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयंत पाटील, भाजपाचे खासदार विनायक सहस्त्रबुद्धे, जॉन पेरी, आनंद साहू, डॉ. विजय ढवळे, भावेश पाठक आदी मान्यवरांची खास व्यास पिठावर उपस्थिती होती. आमदार जयंत पाटील यांनी हा समाज माझा आहे आणि या समाजाच्या कल्याणासाठी मी वैयक्तिक तसेच सरकारी मदत उपलब्ध करुन देत राहीन असे म्हटले. 

इंडियन ज्यूइश फेडरेशनचे प्रेसिडेंट इज़रिएल(विजू) पेणकर यांनी म्हटले की भारत आणि इस्रायलची मैत्री फार चांगले भविष्य घडवील. आम्ही आपल्या समाज बांधवांच्या एकतेचे सर्वांना दर्शन घडवीत आहोत. भारत देशात आम्ही ज्यु-यहूदी समाज गुण्यागोविंदाने राहत असून येथील संस्कृतीचा स्वीकार करीत दुधात साखर मिसळावी तसे मिसळलो आहोत. भारतीय संस्कृतीच्या आणि देशाच्या उत्कर्षात आमचाही प्रामाणिक सहभाग आहे.आमच्या समाजाला भारत सरकार कडून अल्पसंख्यांक दर्जा मिळावा अशी आमची एक मुखाने मागणी आहे आणि ती भाजपा सरकारच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. इंडियन ज्यूइश फेडरेशनचे प्रेजिडेंट विजू पेणकर, चेअरमन जोनाथन सोलोमन, नोएल जेकब, डेविड मोसेस, सैमसन अवास्कर, इसाक तळेगावकर आणि सोलोमन तळकर हजर होते. ज्यू धर्मीयांची सहकुटुंब उपस्थिती आणि त्यांची हिब्रू, मराठी आणि इंग्लिश भाषेतून 
एकमेकांशी साधला जाणारा संवाद चर्चा पाहता येथे एका वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. या वेळी अधिवेशन स्थळा भोवती भायखळा पोलीसांचा खासा बंदोबस्त
 सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली व.पो.नि. अविनाश शिंगटे, राजेन्द्र मचिंदर, संजय भालेराव, शामराव पाटील, महिला उप निरीक्षक सर्वदा सावळे यांचे सह 35 अधिकारी कर्मचारी तैनातीने दिसून येत होता.

 

Web Title: Marathi news mumbai news Israel bene session