कल्याण - केडीएमटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

रविंद्र खरात 
गुरुवार, 1 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) कर्मचारी अधिकारी वर्गाचा जानेवारी, फेब्रुवारी महिन्याचा पगार न दिल्याने आज (ता. 1) सकाळी सभापती संजय पावशे यांना अधिकारी कर्मचारी वर्गाने घेराव घालून ही पगार न झाल्याने दुपारी दीड वाजल्यापासून केडीएमटीच्या गणेश घाट आगारात कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन सुरू केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

सकाळच्या सत्रात केडीएमटीच्या 82 बसेस धावल्या तर दुपारच्या सत्रात कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन सुरू केल्याने केवळ 27 बसेस धावत आहे. बसेस कमी धावत असल्याने ऐन होळीच्या सणाच्या दिवशी सर्व सामान्य नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे .

Web Title: Marathi news mumbai news kalyan kdmt employees not on work