कल्याण - दोन महिने पगार नाही, आता केडीएमटी कर्मचारी वर्गाचा अंत पाहू नका

रविंद्र खरात 
शनिवार, 3 मार्च 2018

कल्याण : दोन महिने झाले तिसऱ्या महिन्याचा चौथा दिवस उजाडला तरी केडीएमटी कर्मचारी वर्गाचा पगार नाही की त्याबाबत चर्चा नाही, यामुळे सोमवारी केडीएमटी कर्मचारी चक्का जाम आंदोलन करणारच मात्र 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा सुरू असल्याने हा चक्का जाम आंदोलन सोमवारी दुपारी 12 वाजता सुरू होईल अशी घोषणा कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियन अध्यक्ष अरविंद मोरे यांनी आज शनिवारी दुपारी केडीएमटी गणेश घाट डेपो मध्ये झालेल्या द्वार सभेत केले. 

कल्याण : दोन महिने झाले तिसऱ्या महिन्याचा चौथा दिवस उजाडला तरी केडीएमटी कर्मचारी वर्गाचा पगार नाही की त्याबाबत चर्चा नाही, यामुळे सोमवारी केडीएमटी कर्मचारी चक्का जाम आंदोलन करणारच मात्र 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा सुरू असल्याने हा चक्का जाम आंदोलन सोमवारी दुपारी 12 वाजता सुरू होईल अशी घोषणा कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियन अध्यक्ष अरविंद मोरे यांनी आज शनिवारी दुपारी केडीएमटी गणेश घाट डेपो मध्ये झालेल्या द्वार सभेत केले. 

नवीन वर्षाचा जानेवारी, फेब्रुवारी महिना संपला आणि मार्च महिना उजाडला तरी केडीएमटीच्या पाचशेहून अधिक कर्मचारी अधिकारी वर्गाचा पगार न झाल्याने सोमवारी (ता. 5) सकाळ पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियन अध्यक्ष अरविंद मोरे यांनी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला असून तीन दिवस झाले पालिका प्रशासनाने कुठलीही हालचाल न केल्याने आज शनिवारी (ता. 3) दुपारी दोनच्या सुमारास केडीएमटी गणेश घाट डेपो मध्ये कर्मचारी वर्गाची द्वारसभा संपन्न झाली यात आंदोलनाची रूप रेषा ठरविण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात अरविंद मोरे यांनी सांगितले की, कर्मचारी वर्गाची समस्या मांडण्यासाठी मान्यता प्राप्त संघटना लागते मात्र येथील मान्यताप्राप्त युनियन प्रशासनाची दलाल झाली असून काल परवा त्यांनी देखावा करत छप्परी आंदोलन केल्याची खिल्ली यावेळी मोरे यांनी केला. तर त्यामुळे कर्मचारी वर्गाचा प्रश्न सूटत नसल्याचा आरोप यावेळी मोरे यांनी केला.

72 कंत्राटी कर्मचारी प्रश्न, पी एफ प्रश्न, पगार, एल आयसी ठेव, आदी प्रश्न जटील होत चालला असून काही कर्मचारी गप्प आहेत काही संघटनेच्या दावणीला बांधले आहेत. त्यामुळे सर्वच कामगारांना त्रास होत आहे . केडीएमटी देविदास टेकाळे यांना बदली हवी तर पालिका आयुक्त पी वेलरासु याना ही बदली हवी पण कर्मचारी वर्गाला वेठीस का धरता असा सवाल करत मोरे पुढे म्हणाले, कर्मचारी वर्गाने कुठल्याही नेत्यांच्या पाठीमागे न जाता स्वतः च्या प्रश्नासाठी आता तरी एकत्र या आता तरी रस्त्यावर उतरले पाहिजे, त्याशिवाय चक्का जाम आंदोलन यशस्वी होणार नाही. तर यावेळी पालिकेत आणि परिवहन समिती मध्ये शिवशाहीची सत्ता असताना केडीएमटीच्या कर्मचारी वर्गावर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त करत मोरे म्हणाले की केडीएमटीला टाळे ठोकण्याअगोदर या कर्मचारी वर्गाला पालिकेत सामावून घ्या आणि खुशाल टाळे ठोकण्याचे आवाहन करत पालिका आचार्य अत्रे नाट्यगृह, हॉस्पिटल हे पांढरे हत्ती पालीका पोसते मात्र केडीएमटी कडे दुर्लक्ष करते असा आरोप मोरे यांनी केला आणि आता चक्का जाम अटळ असून सध्या 10 वी आणि 12 वीची परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून सोमवारी (ता. 5) सकाळच्या सत्रात बसेस सोडू मात्र दुपारी 12 वाजल्या पासून चक्काजाम आंदोलन होणार असल्याची घोषणा यावेळी मोरे यांनी केली.

Web Title: Marathi news mumbai news kdmt no salary employee