राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे - सुनिल तटकरे

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई : आपण ज्या जिद्दीने हे करत आहात त्यामुळे सरकार नक्कीच वठणीवर येईल. आम्ही तुमचा आवाज विधिमंडळात लावून धरू तुमच्या या लढ्यात विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या खांद्याला खांद्या लावून उभी आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांचा लॉंग मार्च नाशिक ते मुंबई असा मुंबईच्या विधानभवनावर धडकला असून आझाद मैदानावर जावून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे मागण्या मान्य होईपर्यंत आहे असा विश्वास दिला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते.
इतका लांब पल्ल्याचा प्रवास करून हे शेतकरी आपला आवाज या मुक्या बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारपर्यंत पोहोचवण्यास आले आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही.

शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ सरकारला आज भेटणार आहे. भेट घेवून आल्यानंतर किसान सभेची जी भूमिका आहे त्याला आमचा पाठिंबा असेल. आपण ज्या जिद्दीने हे करत आहात त्यामुळे सरकार नक्कीच वठणीवर येईल. आम्ही तुमचा आवाज विधिमंडळात लावून धरू असा शब्द प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

Web Title: Marathi news mumbai news kisan long march support rashtravadi