कल्याणमध्ये आयोजिक केलेल्या कोकण महोत्सवाची सांगता

रविंद्र खरात 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कल्याण : कोकण समृद्ध झाले पाहिजे हे सर्व कोकण वासीयांचे मत आहे त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी मधून विकास कामे सुरू झाली असून टप्याटप्यात ती नागरीकांना उपलब्ध होतील असे प्रतिपादन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्व मधील एका कार्यक्रमात केले.

कल्याण : कोकण समृद्ध झाले पाहिजे हे सर्व कोकण वासीयांचे मत आहे त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी मधून विकास कामे सुरू झाली असून टप्याटप्यात ती नागरीकांना उपलब्ध होतील असे प्रतिपादन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्व मधील एका कार्यक्रमात केले.

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान वतीने कल्याण पूर्व मधील पोटे मैदान मध्ये 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2018 या कालावधीत पहिला कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्याचा समारोप रविवारी (ता. 25) सायंकाळी झाला. यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी रायगड जिल्हा पालकमंत्री या नात्याने कोकणातील विकास कामांबाबत सांगताना म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी मधून विकास कामाची माहिती दिली, त्याच बरोबर संपूर्ण गड किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी सहाशे कोटींची तरतुद केल्याचे सांगून सर्व गडकील्ले 2018 अखेर दुरूस्त होतील असे राज्यमंत्री  आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी खासदार कपिल पाटील यांनी कल्याण पूर्वमध्ये पहिल्यादा कोकण महोत्सव आयोजित करत यशस्वी केल्याबद्दल आयोजक संजय मोरे आणि त्यांचे सहकारी यांचे कौतुक करत  भविष्यात 'भारत महोत्सव आयोजित करावा जेणे करून संपूर्ण भारताची संस्कृती अनुभवता येईल असे आवाहन खासदार कपिल पाटिल यांनी यावेळी केले. तर व्यासपीठावर उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक मनोज राय, अर्जुन भोईर, कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान अध्यक्ष अध्यक्ष संजय मोरे, संदीप तांबे, परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Marathi news mumbai news kokan mahotsav over at kalyan