मध्यवैतरणा जलाशयात सापडले अनोळखी प्रेत

भगवान खैरनार
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील कोचाळा सरहद्दीत असलेल्या मध्यवैतरणा जलाशयात एका 30 ते 35 वर्षे वयोगटातील अनोळखी इसमाचे प्रेत तरंगतांना मिळून आलेले आहे. मृत ईसमाची ओळख पटलेली नसल्याने DNA चाचणी साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मोखाडा पोलीसांनी दिलेली आहे. या ठिकाणी दुतर्फा सुरक्षा चौक्यांची मागणी सन 2012 पासून केली जात आहे. परंतू मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून त्याबाबत कोणतेही उत्तरदायीत्व घेतले जात नाही.

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील कोचाळा सरहद्दीत असलेल्या मध्यवैतरणा जलाशयात एका 30 ते 35 वर्षे वयोगटातील अनोळखी इसमाचे प्रेत तरंगतांना मिळून आलेले आहे. मृत ईसमाची ओळख पटलेली नसल्याने DNA चाचणी साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मोखाडा पोलीसांनी दिलेली आहे. या ठिकाणी दुतर्फा सुरक्षा चौक्यांची मागणी सन 2012 पासून केली जात आहे. परंतू मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून त्याबाबत कोणतेही उत्तरदायीत्व घेतले जात नाही.

मुंबई शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारा महत्वाकांक्षी प्रकल्प मोखाड्यातील कोचाळा येथे सन 2012 मध्ये साकार झालेला आहे. या प्रकल्पावर रहदारी साठी आशीया खंडातील सर्वाधीक उंच, लांब, रुंद पुल उभारण्यांत आलेला आहे. त्यामूळे हा पुल आणि त्याखाली दुतर्फा पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे. परंतू पर्यटक पादचारी आणि वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्याची खबरदारी घेण्यात आलेली नाही. मध्यवैतरणा पुलाच्या दुतर्फा सुरक्षा चौक्या उभारणे, सुचना फलक लावणे, रेडीयम लावणे, पथदिवे लावणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्वयंचलीत कॅमेरे लावणे या बाबी अत्यंत आवश्यक आहेत. तथापी सन 2012 साली या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रकल्पावरील पुल रहदारीसाठी मोकळा होऊनही संबंधित विभागाकडून त्यावर कोणतीही उपाययोजणा करण्यात आलेली नाही. 

जलाशयाच्या सुरक्षेचीही गरज -
मध्यवैतरणा प्रकल्प आणि लगतचा विस्तीर्ण दुर्लक्षीत परिसर हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी "मोकळे रान" म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी प्रेतांची विल्हेवाट लावणे किंवा इतर अनूचित वापर करणे इत्यादी कामांसाठी या परिसराचा वापर केला गेला आहे. आत्ता या जलाशयात तरंगत्या अवस्थेत अनोळखी प्रेत मिळून आल्याने या परिसराच्या आणि जलाशय प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. निष्पाप जीवांचा आणि प्रामूख्याने जलाशय सुरक्षेचे गांभिर्य लक्षात घेवून तरी मुंबई मनपाने याकडे डोळसपणे पहाण्याची गरज आहे. एकट्या डॅम प्रकल्पावर 600 कोटी तर ट्रिटमेंट प्लॅन्ट व त्याशिवाय भांडूप पर्यंतचे एकूण 6 प्रोजेक्ट वर सुमारे 1600 कोटी रुपयांचा खर्च केंद्र व राज्य सरकारने केलेला आहे. तर पुलाच्या बांधकामाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेली आहे. तसेच पुलाचे कामही सार्व.बांध.विभागाच्या देखरेखीतच पूर्ण झालेले आहे.

मध्यवैतरणा परिसरात एका बाजूला दाट झाडी व खोल दरी आहे. भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन मागील काही वर्षात शहरी भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी प्रेतांची विल्हेवाट लावणे आदि गंभीर कामांसाठी परिसराचा वापर केलेला आहे. मध्यवैतरणेवरील पुलाची लांबी 150 मिटर असून पुलाची उंची 50 मिटर आहे. पुलाच्या उंचीच्या दुप्पट खोल दरी नदीपात्रात आहे. सद्यस्थितीत पाणीसाठा कमी झालेला असला तरी उन्हाळ्याच्या अखेरी पर्यंत  पुलाच्या गळ्यापर्यंत पाण्याची उंची असते. सर्वार्थाने सुलभ झालेल्या परिस्थितीत सराईत गुन्हेगारांची गुन्हेगारी दुर्लक्षीत आणि शाबूत रहाण्यास मदत होणार आहे. त्यामूळे मानवतेच्या दृष्टीकोणातून खबरदारीची उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतू मागील 4 वर्षात मुंबई महानगरपालिका व सार्व.बांध. विभागापैकी कोणीही त्याची नैतिक जबाबदारी घेतलेली नाही.          

याबाबत मुंबई मनपाशी संपर्क साधला असता; पुलाच्या बांधकाम व देखभाल दुरूस्तीचा मंजूर निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यामूळे त्याची जबाबदारी सार्व.बांध.विभागाचीच असल्याचे त्यांचेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता; पुलाचे बांधकाम व देखभाल दुरूस्ती व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणतीही जबाबदारी नसून दुतर्फा चौक्यांबाबत पोलीसांकडे चौकशी करण्याचे ढोबळ उत्तर मोखाडा सार्व.बांध. विभागाकडून मिळाले आहे. एकूणच मुंबई मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मासलेवाईक उत्तरे देऊन हात वर केले असल्याने जीवांच्या आणि प्रत्यक्ष जलाशयाच्या सुरक्षेला कोणाला जबाबदार धरायचे येथे बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Marathi news mumbai news madhya vaitarana dam dead body