दागिने चोरून पळणारा तोतया पोलिस गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

मुंबई : पोलिस असल्याची बतावणी करून महिलांचे दागिने चोरणाऱ्याला ओशिवरा पोलिसांनी शुक्रवारी (ता. 26) अटक केली. 

कबरअली अन्वरअली जाफरी असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिस पथक भिवंडीला गेले होते. तेव्हा त्याने पोलिसांवरच हल्ला केला होता. जाफरीला शनिवारी (ता. 27) न्यायालयात हजर केले असता, 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

जोगेश्‍वरी परिसरातील एक महिला बुधवारी (ता. 10) सायंकाळी वालावरकर उद्यानाजवळून पायी जात होत्या. तेव्हा त्यांच्याकडे दोघे जण धावत धावत आले. त्यांनी 'आम्ही पोलिस आहोत, पुढे खून झालाय, गोंधळ सुरू आहे, दागिने आमच्याकडे द्या,' असे महिलेला सांगितले. महिलेने घाबरून एक लाख रुपये किमतीचे दागिने रुमालात बांधून त्यांच्याकडे दिले. काही अंतर गेल्यानंतर दोघेही पळून गेले.

महिलेने आरडाओरडा केला. गस्तीवरील पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला. ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सीसी टीव्ही फुटेजमध्ये आरोपींची ओळख पटली.

ओशिवरा पोलिसांचे विशेष पथक शुक्रवारी (ता. 26) कबरअलीला अटक करण्यासाठी भिवंडीच्या पिरवणीवाडी येथे गेले. तो घराबाहेर बसला होता. त्याला ताब्यात घेताना तेथील महिलांनी पोलिसांना धक्काबुक्‍की केली. काही महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली.

धांदल उडाल्याने कबरअलीने पोलिसांना मारहाण केली. या प्रकाराची माहिती भिवंडी पोलिसांना कळवण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कबरअलीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात व्ही. पी. रोड, गोरेगाव आणि अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news mumbai news Mumbai crime news mumbai police