मुंबईत सायकल ट्रॅकच्या कामाला लवकरच सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई : जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिकेने तीन विभागांची निवड केली आहे. टप्प्याटप्प्याने 36 किलोमीटरच्या जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. 

मुंबई : जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिकेने तीन विभागांची निवड केली आहे. टप्प्याटप्प्याने 36 किलोमीटरच्या जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. 

सायकल ट्रॅकची सुरुवात मुलुंड, अंधेरी आणि सहारा येथे होणार आहे. जलवाहिन्यांच्या दोन्ही बाजूला 10 मीटरची जागा ठेवण्यात आली आहे. सायकल ट्रॅक हा डांबरी असेल. त्याचबरोबर सायकल स्टॅण्डही ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, मातीचा जॉगिंग ट्रॅकही तयार करण्यात येणार आहे, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या संपूर्ण प्रकल्पासाठी 488 कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला आहे.

सायकल आणि जॉगिंग ट्रॅकबरोबरच जलवाहिन्यांचा वापर कॅन्व्हॉस म्हणून करण्यात येणार आहे. तेथे नवोदित कलाकारांना त्यांच्या चित्रकलेचे नमुने सादर करता येणार आहे. 

मुंबईतील प्रमुख जलवाहिन्यांच्या बाजूचे अतिक्रमण हटवून त्या संरक्षित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने 80 ते 90 टक्के जलवाहिन्यांच्या बाजूची अतिक्रमणे हटवली आहे. 

मुंबईतील 39 किलोमीटरच्या परिसरात सायकल ट्रॅक बनविण्यात येणार होता; मात्र तीन किलोमीटरच्या जागेत सायकल ट्रॅक बनवायचा झाल्यास विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर तीन किलोमीटरचा सायकल ट्रॅक बांधण्यात येईल. 

  • मुलुंड पश्‍चिम (मुलुंड बॉण्ड्री ते मुलुंड चौकी) - 1.3 किलोमीटर 
  • अंधेरी पूर्व (मोरारजी गेट ते मरोळ मोरशी) - 2.1 किलोमीटर 
  • सहारा - 1 किलोमीटर
Web Title: marathi news mumbai news mumbai cycle track