कोस्टल रोडमुळे एक लाख रोजगार 

representational image for Costal Road
representational image for Costal Road

मुंबई : कोस्टल रोडमुळे सुमारे एक लाख रोजगार निर्मिती होईल, असा दावा शुक्रवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला. एप्रिल महिन्यापासून कोस्टल रोडच्या नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी एक हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्याची निविदा प्रक्रिया संपली असून निविदा पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत बांधकामाचे कंत्राट दिले जाणार आहे, असे आयुक्तांनी जाहीर केले.

कोस्टल रोडमुळे कार्बन डायऑक्‍साईड उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, तसेच 54 हेक्‍टर हरितपट्टा निर्माण होणार आहे. त्याबरोबरच जलद बस वाहतुकीसाठी मार्गिकाही ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत या मार्गिकेचाही वापर करण्यात येणार आहे. कोस्टल रोडमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एक लाख रोजगार निर्मिती होईल, असा दावाही आयुक्तांनी केला. 

लिंक रोडसाठी 100 कोटी 
मुलुंड गोरेगाव या जोड रस्त्यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या आदेशानुसार वर्षभर पर्यावरणीय अभ्यास करावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील नाहूर रेल्वेस्थानकाच्या परिसरातील काम सुरू केले असून नाहूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com