मुंबईत थंडीचा कडाका कायम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

मुंबई : उत्तर भारतातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने मुंबईसह राज्याच्या अनेक भागात थंडी वाढली आहे. चार दिवसांपासून मुंबईत किमान तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला आहे.

कोरडे वातावरण थंडीसाठी पोषक आहे. विदर्भात सोमवारपर्यंत थंडीची लाट कायम राहील, असा इशारा केंद्रीय वेधशाळेने दिला आहे. 

आठवड्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील बहुतांश भागांतील तापमानाचा पारा पुन्हा खाली घसरायला सुरुवात झाली. चार दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान पंधराच अंशाच्या दरम्यान राहिले आहे. बुधवारी किमान तापमान 15.4, गुरुवारी 15.1 अंश सेल्सिअस तापमान होते. तर गेल्या दोन दिवसांपासून तापमान 15.6 अंश सेल्सिअसवर कायम आहे. काही दिवसांत पारा एक ते दोन अंशाने वाढला, तरीही थंडीत फारसा फरक पडणार नाही, अशी शक्‍यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तवली. 

मुंबई वगळता कोकणातील इतर भागांतही किमान तापमानात एका अंशाने घट झाली. मराठवाडा आणि विदर्भात शनिवारी थंडीची लाट आहे. संपूर्ण राज्यात कोरडे वातावरण असल्याने थंडीसाठी सध्या पोषक स्थिती आहे. 

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news mumbai news Mumbai weather