ठाणे - मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर स्वप्नच

नंदकिशोर मलबारी
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सरळगाव (ठाणे) : नुकतेच रेल्वे बजेट जाहीर झाले. मात्र या बजेटमध्ये कल्याण-मुरबाड रेल्वे साठी कोणतीही तरतूद नसल्याने अखेर मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर स्वप्नच ठरल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्येक्त केली जात आहे.          

सरळगाव (ठाणे) : नुकतेच रेल्वे बजेट जाहीर झाले. मात्र या बजेटमध्ये कल्याण-मुरबाड रेल्वे साठी कोणतीही तरतूद नसल्याने अखेर मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर स्वप्नच ठरल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्येक्त केली जात आहे.          

कल्याण - मुरबाड रेल्वे होणार असे स्वप्न अनेक राजकारण्यांना मुरबाडवासियांना अनेक वर्ष दाखवले मात्र रेल्वेचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. प्रत्येक निवडणुकीच्या काळात रेल्वेवर भाषणे ठोकून सत्तेत असणाऱ्यांनी मुरबाडकरांच्या तोंडाला पाने पूसण्याचे काम 60 वर्ष केले. तर सत्तेच्या बाहेर असणाऱ्यांनी आम्हाला निवडून द्या पहिल्या रेल्वे बजेटला कल्याण-मुरबाड रेल्वेचा रेंगाळलेला प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले. 

या सत्तेत भिंवडी लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून कपिल पाटील निवडून आले. कपिल पाटील म्हणजे मुरबाडशी नाळ जोडलेले एक व्यक्तीमत्व. आम्हा मुरबाडकरांना आनंद झाला. आता तरी रेल्वे येणार याची खाली आम्हाला पण झाली आणि तशी खात्री कपिल पाटील यांनीही दिली. सत्तेत आलेल्या पहील्या रेल्वे बजेट मध्ये कल्याण-मुरबाड रेल्वे साठी कोणतीही तरतूद न केल्याने मुरबाडकरांची मोठी निराशा झाली.

अनेकांनी बोलायला सुरवात केली. आम्ही हा प्रश्न रेल्वे मंत्र्यांशी बोलून झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस अर्धा खर्च उचलण्यास तयार आहेत अशी माहिती कल्याण येथे झालेल्या वार्ताहर परिषदेत खासदार कपिल पाटील यांनी उपस्थित पत्रकांना सांगून हा रेल्वे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत ठेवला. मुरबाड तालुक्यात झालेल्या अनेक कार्यक्रम आता लवकरच रेल्वे मुरबाडला पोहोचणार असे स्वप्न दाखविले जाऊ लागले. चला जाऊ द्या आज नाही तर उद्या येणार या आशेवर दुसऱ्या आणि अखेरच्या बजेटची वाट पहात बसलो. भाजपाच्या सत्तेतील हे शेवटचे बजेट असल्याने या बजेटमध्ये कल्याण-मुरबाड रेल्वे साठी मोठी तरतूद होणार या आशेवर टीव्ही समोर बसून राहीलो पण पुन्हा आपली फसवणूक झाली असल्याचे मुरबाडकरांच्या लक्षात आले. तालुक्यात वेगळी चर्चा होऊ लागली.

60 वर्ष सत्तेत होते त्यांनी आणि आता सत्तेत असणाऱ्यांनी मुरबाडकरांच्या तोंडाला पाने पुसली आता गेले त्यांना पुन्हा सत्तेत आणायचे की जे सत्तेत आहेत त्यांच्याकडून अजून  60 वर्ष वाट पाहायची असा प्रश्न मुरबाडकरांना पडल्याची जोरदार चर्चा आहे. मुरबाड विधान सभेचे आमदार यांनी तालुक्यात विकास कामाचा सपाटा लावला आहे. मुरबाड शहर स्मार्ट शिटी बनवायची आहे. पण आमच्या मनातील रेल्वे मुरबाडपर्यंत आल्याशिवाय आम्हाला आनंद नाही असे मुरबाडकर बोलू लागले आहेत.

रेल्वे न आल्याने आमचे मुरबाड मुंबईशी जोडला जाणार नाही आणि मुरबाड मुंबईशी जोडल्याशिवाय आमची आर्थीक परीस्थिती सुधारणार नाही. असे अनेक तरुणांचे म्हणणे असल्याने आता या पूढे रेल्वेचे काय हा प्रश्न कोणाला विचारायचा हा प्रश्न मुरबाडकरांना पडला आहे. 

Web Title: Marathi news mumbai news murbad railway