संयुक्त राष्ट्र संघातील न्यूयॉर्क अधिवेशनासाठी आ.डॉ.नीलम गोऱ्हे न्यूयॉर्कला दाखल

संजय शिंदे
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई : न्यूयॉर्क येथे जागतिक महिला आयोगाचे ६२ वे अधिवेशन होत आहे. १२ मार्च, २०१८ ते २३ मार्च, २०१८ या दरम्यान होणाऱ्या सत्रात 'ग्रामीण स्त्रिया आणि मुलींच्या सक्षमीकरण व स्त्री पुरुष समानतेसाठी आव्हाने तसेच ते साध्य करण्यास योग्य ती संधी' विषयात काय प्रगती झाली याबाबत प्रत्येक देशातील सरकारे आढावा सादर करणार आहेत. या अधिवेशनातील उपविषय 'माध्यमातील स्त्रियांचा सहभाग तसेच माहिती तंत्रज्ञानाचा स्त्रियांच्या प्रगतीतील साधन म्हणून परिणामकारकता' आहे. २००३ यावर्षी ४२व्या अधीवेशनात या उपविषयावर जागतिक ठराव  झाले होते, त्याच्या कार्यवाहीचे  मूल्यमापन केले जाणार आहे.

मुंबई : न्यूयॉर्क येथे जागतिक महिला आयोगाचे ६२ वे अधिवेशन होत आहे. १२ मार्च, २०१८ ते २३ मार्च, २०१८ या दरम्यान होणाऱ्या सत्रात 'ग्रामीण स्त्रिया आणि मुलींच्या सक्षमीकरण व स्त्री पुरुष समानतेसाठी आव्हाने तसेच ते साध्य करण्यास योग्य ती संधी' विषयात काय प्रगती झाली याबाबत प्रत्येक देशातील सरकारे आढावा सादर करणार आहेत. या अधिवेशनातील उपविषय 'माध्यमातील स्त्रियांचा सहभाग तसेच माहिती तंत्रज्ञानाचा स्त्रियांच्या प्रगतीतील साधन म्हणून परिणामकारकता' आहे. २००३ यावर्षी ४२व्या अधीवेशनात या उपविषयावर जागतिक ठराव  झाले होते, त्याच्या कार्यवाहीचे  मूल्यमापन केले जाणार आहे. या अधिवेशनात शिवसेना प्रवक्त्या तथा उपनेत्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे व गुणवत्ता सल्लागार तथा स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी उपस्थित राहणार आहेत.

कृतीसत्रात स्वयंसेवी संघटनांना सहभागी होण्यास आर्थिक - सामाजिक विकास परिषदेशी जोडून घेऊन सहभाग घेतला जातो. त्याचा भाग म्हणून १९९५ ते २०१८ सातत्याने स्त्री आधार केंद्राने या प्रक्रियेत सक्रिय  सहभाग घेतला आहे. या अधीवेशनातील व आशिया ऊपखंड, द.अशियातील महिला विकास प्रयत्न व कार्याची माहिती धोरणकर्ते व सामान्य महिला यांना देऊन कायद्याच्या व विकास योजनांच्या अंमलबजावणी व चालना देण्याचे काम संस्थेच्या मार्फत विविध स्तरावर गेली ३४ वर्षे चालू अाहे. 

सीडाँ करार, बीजिंग विश्व महिला संमेलन (१९९५) कार्य करार, फलश्रुती दस्तऐवज (२०००), दक्षिण आशियातील मुलींच्या व्यापारास प्रतिबंध करण्यास करार यावर मराठीत भाषांतर व माहिती वितरणाचे काम संस्थेने केले आहे.

तसेच प्रत्यक्षातील याबाबत  कामासोबत 'शाश्वत विकासांची  उद्दिष्टे, हवामान बदल व महिला सक्षमीकरण' या विषयांवर पैरवी- नवी दिल्ली, सिकॉडीकॉन-राजस्थान 'बियॉंड कोपनहेगन'  यांच्या सोबत स्त्री आधार केंद्र  गेली ५ वर्षे नेटवर्कमध्ये काम करत आहे. पुण्यात व महाराष्ट्र दुष्काळ निवारण कार्यात 'जनसाथी दुष्काळ निवारण मंच' यांच्या सोबत १८० गावे व १० जिल्ह्यातील संस्थांसमवेत  सहयोग व त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला जात आहे. संस्थेने गेल्या २५ वर्षात केलेल्या कामावर आधारित  'नैसर्गिक आपत्तीतील महिला व मुले यांच्यावर होणारे परिणाम व त्याबाबतच्या दक्षतांसाठी तंत्रज्ञानाच उपयोग' यावर स्त्री आधार केंद्राने एक परिसंवादही न्यूयॉर्क येथे १३ मार्च रोजी आयोजित केला आहे. आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या परिसंवादात श्रीमती अपर्णा सहाय, श्री एन.एन. चंद्रा (सेंटर फॉर ग्लोबल एज्युकेशन, अमेरिका) व दक्षिण आशियातील संस्था प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 

अधिवेशनात जागतिक सरकार आढाव्या समवेत समांतर ४०० कृतिसत्रे व विविध देशांनी, जागतिक निमसरकारी एजन्सी आयोजित ३५० परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये ८ मार्च रोजी संयुक्त राष्ट्र संघात 'गुलाम गिरी आढावा: मोठ्याने आवाज उठवा' हे प्रदर्शन, 'जागितक स्तरावर दहशतवाद विरोधी लढ्यात स्त्रियांचे नेतृत्व व सहभाग' 'हवामान बदलाच्या आव्हान व महिला व मुलींचे सक्षमीकरण' ग्रामीण मातांचे बाळांतपणातील मृत्यू व बालविवाह: मला नाही म्हणायचा अधिकार आहे, हे कोणी सांगितलेच नाही!' या विषयावर जागतिक महिला आरोग्य महासंघ, न्यूझीलंड, झांबिया, कॅनडा सरकार आयोजित चर्चा, 'स्त्री हिंसाचार रोखण्यास कार्यपद्धती व नियमांचे नियोजन' 'ईंटर पार्लमेंटरी युनियन' आयोजित 'राजकारणातील स्त्रियांवर होणारे हिंसाचार' अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहेत. भारत सरकारने 'ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण' यावर १४ मार्च ला व 'पाणी, स्वच्छता व महिला सक्षमीकरण' या दोन विषयांवर कृतीसत्रे आयोजित केली आहेत. 

भारतातून ४० स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी व काही केंद्र सरकारचे  प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. या अधिवेशनातील जागतिक ठराव व त्याचा देशातील व राज्यातील स्थानिक  संदर्भ याची माहिती केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच समाजाच्या विविध घटकांना माहिती देऊन कार्यवाहीसाठी आ.डॉ.नीलम गोऱ्हे पाठपुरावा करणार आहेत.

Web Title: Marathi news mumbai news nilam gorhe went to newyork for united nation