झेडपी कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनंतर बदली

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची विनंती बदलीची पाच वर्षे सेवेची अट रद्द करून कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर तीन वर्षे कालावधी पूर्ण केल्यानंतर विनंती बदलीस पात्र ठरविण्यात येणार असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या समस्यांबाबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचे स्वागत राज्यातील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी केले आहे. 

जिल्हा परिषदांतर्गत काम करणाऱ्या परिचर संवर्गातून कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीचा कोटा वाढवून तो 75 टक्के करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे डीसीपीएसमधील रकमेचा हिशेब देण्याबाबत जिल्हा परिषदांना सूचना देण्यात येणार आहेत. सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जॉब कार्ड देण्याबद्दल सूचना देण्यात येतील. परिचर व वाहनचालक यांच्या गणेवशापोटी रकमेत 2 हजारांऐवजी अधिक रक्कम देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

परिचर व वाहनचालक यांना गेल्या अनेक वर्षांपासून धुलाई भत्ता 50 रुपये दिला जात होता. आता त्यामध्ये वाढ, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची विविध पदांवरची पदोन्नती, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना घरबांधणी व संगणक अग्रिम आदी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन पंकजा मुंडे यांनी दिले. 

Web Title: marathi news mumbai news Pankaja Munde