पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची धरपकड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

शिवसेनेच्या या निर्णयामुळे कार्यक्रमात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी कडक कारवाई करत शिवसेना रायगड जिल्हासंपर्क प्रमुख संजय मोरे, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नवी मुंबईत येणार आहेत. उद्घाटनकार्यक्रम पत्रिकेत स्थानिक शिवसेना खासदार आणि आमदारांचे नाव न छापल्याने भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवत निषेध करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेच्या या निर्णयामुळे कार्यक्रमात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी कडक कारवाई करत शिवसेना रायगड जिल्हासंपर्क प्रमुख संजय मोरे, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

Web Title: Marathi News Mumbai News Panvel PM Function Shivsena Members