आरोप रद्द करण्यासाठी प्रज्ञासिंह उच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - मालेगावमध्ये दहा वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने आपल्यावरील आरोप रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

मुंबई - मालेगावमध्ये दहा वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने आपल्यावरील आरोप रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञाविरोधात आरोप दाखल केले आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने साध्वी प्रज्ञाला "क्‍लीन चिट' दिली होती; पण विशेष न्यायालयाने तिची खटल्यातून दोषमुक्त करण्याची मागणी अमान्य केली आहे. त्याविरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. माझ्याविरोधात कोणताही पुरावा नसल्यामुळे मला या खटल्यातून दोषमुक्त करावे, अशी मागणी तिने केली आहे. न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Web Title: marathi news mumbai news pradnya sinh high court