दोन दिवस हलक्‍या सरींची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 15 व 16 मार्चला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण असेल. या परिसरातील तापमानात घट होणार असून, या दोन दिवसांत हलक्‍या पावसाच्या सरी पडण्याची शक्‍यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

दरम्यान, या काळात गारपीट किंवा वादळाची शक्‍यता नसून शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेवू नये, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. याकाळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ढगाळ वातावरण आणि हलक्‍या सरींमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आवश्‍यक उपाययोजना करून शेतमालाचे नुकसान टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: marathi news mumbai news rain