अखेर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला

संजीत वायंगणकर
बुधवार, 10 जानेवारी 2018

डोंबिवली : आयरेगाव येथील लालबहाद्दूर शास्त्री क. डों. म. पा. शाळा क्रमांक 21 येथे शाळा दुरुस्ती व नुतनीकरण कामाचा शुभारंभ पालिकेच्या शिक्षण विभाग सभापती वैजयंती घोलप-गुजर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. पावसाळ्यात या दुमजली शाळेच्या सर्व भिंती ओल्या होऊन पाणी पाझरत होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच वर्गातील फरश्या तुटल्यामुळे विद्यार्थी धडपडत व जखमी होत. याची दखल घेऊन शिवसेनेचे माजी विभागप्रमुख हरिश्चंद्र पराडकर यांनी शिक्षण मंडळात अनेकदा तक्रारी केल्या. परंतु अधिकारी दाद देत नाहीत असे पाहून थेट शिक्षण मंत्र्यांनाही तक्रार केली.

डोंबिवली : आयरेगाव येथील लालबहाद्दूर शास्त्री क. डों. म. पा. शाळा क्रमांक 21 येथे शाळा दुरुस्ती व नुतनीकरण कामाचा शुभारंभ पालिकेच्या शिक्षण विभाग सभापती वैजयंती घोलप-गुजर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. पावसाळ्यात या दुमजली शाळेच्या सर्व भिंती ओल्या होऊन पाणी पाझरत होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच वर्गातील फरश्या तुटल्यामुळे विद्यार्थी धडपडत व जखमी होत. याची दखल घेऊन शिवसेनेचे माजी विभागप्रमुख हरिश्चंद्र पराडकर यांनी शिक्षण मंडळात अनेकदा तक्रारी केल्या. परंतु अधिकारी दाद देत नाहीत असे पाहून थेट शिक्षण मंत्र्यांनाही तक्रार केली. त्यांच्या आदेशालाही अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली याबाबत सकाळने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले. त्यानंतर वैजयंती घोलप यांची सभापतीपदी निवड झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन या प्रकरणाला चालना दिली. आता शिक्षण मंडाळाने या दुरुस्तीसाठी पंधरा लाख रुपयांचे टेंडर मंजूर केले. हे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती शिक्षणविस्तार अधिकारी जगदाळे यांनी दिली. याप्रसंगी सदस्या छाया वाघमारे, अभियंता गजानन पाटील, श्याम भोईर (सर्वशिक्षा अभियान) मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

 

Web Title: Marathi news mumbai news renovation of school