खड्डे दुरुस्तीवर यंदा दुपटीने खर्च

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मुंबई - रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीवर येत्या पावसाळ्यात दुपटीने खर्च होणार आहे. आगामी काळात खड्डे दुरुस्तीसाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाने डांबराचे मिश्रण बनविण्याचा खर्च देशी तंत्रज्ञानाच्या दुप्पट आहे.

मुंबई - रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीवर येत्या पावसाळ्यात दुपटीने खर्च होणार आहे. आगामी काळात खड्डे दुरुस्तीसाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाने डांबराचे मिश्रण बनविण्याचा खर्च देशी तंत्रज्ञानाच्या दुप्पट आहे.

खड्डे दुरुस्तीसाठी पालिका कोल्डमिक्‍स किंवा हॉटमिक्‍स या देशी डांबर मिश्रणाचा वापर करते. या मिश्रणाच्या प्रत्येक किलोसाठी 12 ते 15 रुपये खर्च येतो; मात्र त्याचा फायदा होत नाही. खड्डे दुरुस्त केल्यानंतर लगेच पाऊस झाल्यास हे मिश्रण वाहून जाते. त्यावर उपाय म्हणून पालिकेने परदेशी तंत्रज्ञानाने बनविलेले मिश्रण वापरण्यास सुरवात केली आहे. या मिश्रणाच्या प्रत्येक किलोसाठी सुमारे 28 रुपये खर्च येतो. या मिश्रणाचा परिणाम चांगला दिसत असल्याने ते वापरण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या मिश्रणाचे नाव गोपनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे मिश्रण पालिका स्वत: तयार करणार आहे. पावसाळ्यापूर्वी या मिश्रणाचे उत्पादन सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. पालिका वर्षाला खड्डे दुरुस्तीवर 35 ते 40 कोटी खर्च करते. गेल्या सहा वर्षांत सुमारे रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी 200 कोटी पालिकेने खर्च केले आहेत.

वर्ष आणि खड्ड्यांची संख्या
- 2014-15 -- 14 हजार 455
- 2015-16 -- पाच हजार 316
-- 2016-17 -- चार हजार 478
-- 2017 एप्रिल ते ऑक्‍टोबर - एक हजार 500

Web Title: marathi news mumbai news road hole repairing expenditure

टॅग्स