आरटीई प्रवेशाची पहिली यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - शिक्षण हक्क कायदा 2009 तील तरतुदींनुसार शहरातील खासगी इंग्रजी शाळांतील प्राथमिक वर्गात 25 टक्के आरक्षणाची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत पहिलीसाठी दोन हजार 151; तर अन्य प्राथमिक वर्गांसाठी एक हजार 88 प्रवेश झाले. तीन हजार 239 विद्यार्थ्यांना पहिल्या लॉटरीत जागा मिळाली. यंदा आठ हजार 900 जागांसाठी ही लॉटरी निघाली. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ही प्रक्रिया राबवली जाते. 10 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रियेस यंदा सुरवात झाली होती. या वर्षी 10 हजार विद्यार्थ्यांनी लॉटरीसाठी अर्ज केले आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी 347 शाळांनी सहभाग नोंदवला आहे. पालकांना शाळेत प्रवेश घेण्याची मुदत 24 मार्चपर्यंत राहील. दुसरी लॉटरी 31 मार्च; तर तिसरी लॉटरी 18 एप्रिलदरम्यान जाहीर होतील.
Web Title: marathi news mumbai news rte entrance first list declare