सलमान विरोधात अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा , वाल्मिकी समाजाची मागणी

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबादेवी : टायगर जिंदा है या हिंदी चित्रपटाचा नायक आणि सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्यावर त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सर्व सफाई कामगार आणि वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सलमान खान व शिल्पा शेट्टीवर पोलिसांनी अॅट्रोसिटी अॅक्टनुसार तात्काळ गुन्हा नोंदवावा अन्यथा आमच्या संघर्षमय आंदोलनाचा प्रताप साऱ्या जगाला दाखवू असा पवित्रा घेतला आहे. 

या संदर्भात मुंबई प्रदेश हरिजन भंगी सेवा समाज आणि महात्मा फुले मागास वर्ग विकास मंडळ मुंबईचे सदस्य खेमचंन्द्र सोलंकी, चंपकलाल सोलंकी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्र परिषदेत इशारा देत म्हटले आहे की, सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी जाती वाचक "भंगी" शब्दाचा जाहिररित्या प्रयोग केल्याने आमच्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाने भंगी या शब्दाचा  कुठल्याही परिस्थीतीमध्ये जाहिररित्या प्रयोग केल्यास अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन घ्यावा असे आदेश दिले आहेत. भंगी हे सफाई कामगार नसून संपूर्ण समाज आणि पोट जाती आहेत. सलमानच्या वक्तव्यामुळे आमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने सदर बाब आम्ही सीडी, व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून पुरावे दिले आहेत. सलमान आणि शिल्पा शेट्टीवर तात्काळ अट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई व्हावी अन्यथा आमच्या समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.

Web Title: Marathi news mumbai news salman atrocity act walmiki community