समुद्रात वादळाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्य दिशेला तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढत आहे. काही दिवसांत या पट्ट्याचे रूपांतर वादळात होण्याची दाट शक्‍यता केंद्रीय वेधशाळेने मंगळवारी वर्तवली.
हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय पट्ट्यावर आणि बंगालच्या उपसागरातील नैर्ऋत्य भागात रविवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला.

मंगळवारी या पट्ट्याची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर न्यून कमी दाबाच्या पट्ट्यात झाले. वादळापूर्वीच्या अवस्थेत हा पट्टा आहे. दोन दिवसांत न्यून कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होईल, असा इशारा केंद्रीय वेधशाळेने दिला आहे.

मंगळवारी न्यून कमी दाबाचा पट्टा मिनीकॉयच्या आग्नेय दिशेपासून 480 किलोमीटर, तिरुअनंतपुरमच्या नैर्ऋत्य दिशेपासून 390 किलोमीटर, मालदीवच्या ईशान्य भागापासून 290 किलोमीटरवर होता.
या न्यून कमी दाबाच्या प्रभावामुळे तमिळनाडू, केरळ येथील दक्षिण भागांतील किनारपट्टी आणि लक्षद्वीप या भागांमध्ये जोरदार अतिवृष्टी होईल. तमिळनाडूच्या दक्षिण भागात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडेल. केरळमध्ये बुधवारी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. या पट्ट्यामुळे दक्षिण तमिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीजवळ दोन दिवस जोरदार वारे वाहतील. सध्या या परिसरात ताशी 40 ते 60 प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. वेधशाळेने वर्तवलेल्या या इशाऱ्यानंतर मालदीव, तमिळनाडूच्या दक्षिण भागातील किनारपट्टी, मन्नारचे आखात, केरळ किनारपट्टी आणि लक्षद्वीप येथील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वादळ तयार होण्यापूर्वीची स्थिती
कमी दाबाचा पट्टा- तीव्र कमी दाबाचा पट्टा- न्यून कमी दाबाचा पट्टा - तीव्र न्यून कमी दाबाचा पट्टा- वादळ - तीव्र चक्रीवादळ.

Web Title: marathi news mumbai news sea storm