शिवजयंती निमित्त कल्याण पूर्व मधील नागरीकांना अनोखी भेट

रविंद्र खरात 
रविवार, 4 मार्च 2018

 कल्याण पूर्व मधील बहुतांश नागरीक रिक्षा ने प्रवास करतो, याधर्तीवर आज कल्याण पूर्व सिध्दार्थ नगर येथील रिक्षा स्टँडवर ज्या रिक्षांवर भगवा ध्वज आणि त्यांच्या पाठीमागे विनामुल्य रिक्षा सेवेचा स्टिकर आहे. त्या सर्व रिक्षा प्रवाशांसाठी विनामुल्य सेवा देण्यात आली.

कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने आज रविवार ता 4 मार्च रोजी कल्याण पूर्व मध्ये नागरीकांना सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत मोफत रिक्षा प्रवास सुविधा देऊन कल्याण पूर्व मधील नागरीकांना एक अनोखी भेट दिली. 

आज रविवारी (ता. 4 मार्च) छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कल्याण पूर्व पश्चिम मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्व मधील शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने आज आगळी वेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली. कल्याण पूर्व मधील बहुतांश नागरीक रिक्षा ने प्रवास करतो, याधर्तीवर आज कल्याण पूर्व सिध्दार्थ नगर येथील रिक्षा स्टँडवर ज्या रिक्षांवर भगवा ध्वज आणि त्यांच्या पाठीमागे विनामुल्य रिक्षा सेवेचा स्टिकर आहे. त्या सर्व रिक्षा प्रवाशांसाठी विनामुल्य सेवा देण्यात आली. या सेवेचा शुभारंभ शिवसेना पालिका गटनेते रमेश जाधव, नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड, परिवहन समिती सदस्य मनोज चौधरी, दलित मित्र अण्णा रोकडे, शरद पाटील, नितीन मोकळ, पुष्पा ठाकरे आदींच्या उपस्थित झाला. यावेळी छोटेखानी भाषणात शिवसेना पालिका गटनेते यांनी या सेवेचे कौतुक करत म्हणाले की सामाजिक एकोपा आणि सामाजिक सलोख्यासाठी शिवजयंती निमित्त मोफत रिक्षा सेवा मोफत ठेवण्यात आली असून नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर दलित मित्र अण्णा रोकडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की शिवजयंती निमित्त रिक्षा प्रवास मोफत हा उपक्रम प्रत्येक वर्षी केवळ एकाच युनियनने न करता या स्टँडवरील चारही युनियनने रिक्षा मोफत करा असे आवाहन रोकडे यांनी यावेळी केले. कल्याण पूर्व मध्ये शिवजयंती निमित्त प्रथमच मोफत रिक्षाने प्रवास करण्यास नागरीकांना मिळाल्याने त्यांनी ही चांगला प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला.

 

Web Title: marathi news mumbai news shivaji maharaj jayanti program