नागपाडा येथे शांततेत कडकडीत बंद

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबादेवी : एक जानेवारी रोजी पुणे येथील भीमा कोरेगाव येथील घटनेचा जाहिर निषेध बौद्धजन पंचायत मध्यवर्ती मंडळ सिद्धार्थ नगर यांचे नेतृत्वाखाली करण्यात आला.

मुंबादेवी : एक जानेवारी रोजी पुणे येथील भीमा कोरेगाव येथील घटनेचा जाहिर निषेध बौद्धजन पंचायत मध्यवर्ती मंडळ सिद्धार्थ नगर यांचे नेतृत्वाखाली करण्यात आला.

यात कामाठीपूरा 9, 10, 13 गल्ली, मुंबई सेंट्रल शाखा क्र. 40, बौद्धजन सेवा समिती बीआयटी चाळ, बटाटा चाळ यांचा मिळून जवळ पास हजार ते बाराशे आंबेडकरी अनुयायी त्यांच्यासह आबाल वृद्ध यांनी सहभागी होत मोर्चा काढून महाराष्ट्र बंद मध्ये सामील झाले. नागपाड़ा पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बसवंत यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी. अशी मागणी या वेळी आंबेडकरी अनुयायांनी केली. आंबेडकरी जनतेने शांतता राखावी असे आवाहन पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

Web Title: Marathi news mumbai news strike in nagpada