250 विद्यार्थ्यांचा पोलिसांसह रेझिंग डे परेड मार्च संपन्न

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

यूपीएससी, एम्पीएससीच्या परिक्षांचा अभ्यास करुन यशस्वी व्हावे. पोलीस, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स सारख्या यूनिफार्म फ़ोर्स मध्ये करियर करायचे स्वप्न पहा आणि प्रत्यक्षात आणा.देश सेवेकरिता यूनिफार्म सर्विस हाच उत्तम पर्याय आहे.

मुंबई : स्कॉट सावधान ! स्कॉट विश्राम !!
दो कदम आगे बढ़ ! दो कदम पिछे हो !! स्कॉट होशियार !! जवान अपनी नजर सौ गज की दुरी पर रख्खो !! तेज चलो!! स्कॉट मध्यसे तेज चल !! लेफ्ट राइट लेफ्ट !! अशा खणखणीत गगनभेदी आर्मी टाइप ऑर्डर देत महिला पोलिस उपनिरीक्षक शोभा भांडवणकर यांच्या नेतृत्वाखाली सेंट जोसेफ हायस्कूल च्या 250 विद्यार्थ्यांचा ताफा पोलिसांसह रेझिंग डे साठी मार्च करीत निघाला. तो विभागात आपली परेड(संचलन) दाखवत डोंगरी पोलिस ठाण्यात पोहचला. त्या वेळी रस्त्यावरून येजा करणारी लोकं आणि विशेषतः लहान मुले परेड जवळ येताच स्मित हास्य करीत कुतुहलाने पहात होती,आणि उजव्या हाताने सैनिकी सलामी देत होती.असे हे विहंगम दृश्य पाहुन लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची आठवण झाली नसेल तर नवलच म्हणावे लागेल? 

सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पोलीस रेझिंग डे निमित्त निघालेला हा मार्च सेंट जोसेफ शाळेतील 250 मुले व मुली यांच्या "विद्यार्थी  जनजागृती अभियान" निमित्त काढण्यात आला होता.सदर मार्च सेंट जोसेफ स्कूल ते सामंत भाई नानजी मार्गाने  सुरु होऊन पुढे नूरबाग जंक्शनला उजवे वळण घेऊन डॉक्टर मैशेरी रोड ने डोंगरी पोलीस ठाणेत विसर्जित करण्यात आला.पोलीस ठाण्याचे व.पो.नि. संदीप भागडीकर, पोलिस निरीक्षक शशिकांत यादव, तांबोळी, शशिकांत पाडावे, सुधाकर कांबळे,महिला सपोनि.सोनाली भारते, उप.नि. सचिन पालवे, प्रकाश दिनकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.पोलिस उप निरिक्षक सचिन पालवे यांनी विदयार्थ्यांना पोलीस ठाण्यातील विविध विभाग कायदा व सुव्यवस्था,गुन्हे प्रकटीकरण, जनसंपर्क आदी कामकाजा बद्दल जुजबी माहिती दिली.आपले स्वसंरक्षण कसे करावे? संकटात पोलिस मदत कशी घ्यावी? मुलींनी निर्भय पणे पोलिसांत आपल्याला होत असलेल्या त्रासा बद्दल कसे कळवावे ? अचानक उद्भवलेल्या संकटाचा सामना कसा करावा? या बद्दलची माहिती महिला पोलिस उप निरीक्षक शोभा भांडवणकर यांनी मुलामुलींना मार्गदर्शन करताना दिली.तसेेेच ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्ति यांनी त्रास दिल्यास आपल्या घरी आई-बाबा,शाळेत शिक्षकांना आणि पोलिसांना या बद्दल सविस्तर माहिती कशी द्यावी हे समजावून सांगितले. पोलिस नियंत्रण कक्षाच्या डायल 100 नम्बर चा उपयोग कसा करावा याची विशेष माहिती त्यांनी मुलींना दिली.वपोनि.संदीप भागडीकर आणि पो.नि.मोहन येडूरकर यांनी मुलांना मुलींना पोलिस शस्त्र,गन, रायफल,रिवाल्वर आणि आसु गॅस कधी आणि कसे वापरतात याची माहिती दिली.

या प्रसंगी संदीप भागडीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की जीवनावर प्रेम करा.आपल्या देशावर भारतावर प्रेम करा.सर्व धर्मांचा आदर करा.निसर्ग वाचवा. प्रदूषण रोखा.पाणी वाचवा. जल हे जीवन आहे. तुम्ही सर्वांनी कठोर परिश्रम करुन उत्तम अभ्यास करावा. पदवी मिळवावी. डॉक्टर,इंजीनियर, आर्किटेक्चर, अर्कोलोजिस्ट, भूगर्भ शास्त्रज्ञ व्हा.

यूपीएससी, एम्पीएससीच्या परिक्षांचा अभ्यास करुन यशस्वी व्हावे. पोलीस, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स सारख्या यूनिफार्म फ़ोर्स मध्ये करियर करायचे स्वप्न पहा आणि प्रत्यक्षात आणा.देश सेवेकरिता यूनिफार्म सर्विस हाच उत्तम पर्याय आहे.

Web Title: Marathi news Mumbai news student in parade