ठाण्यात आंध्रप्रदेशचा गांजा हस्तगत ; रिक्षाचालकासह फेरीवाला अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

ठाण्यातील रेल्वेस्थानक परिसरात काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थविरोधी पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातील ओम साई बेल्ट या दुकानाच्या समोरून दोघा संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्या वेळी त्यांच्याकडे सॅकमध्ये लपवलेला एक लाख एक हजार किमतीचा साडेसहा किलो गांजा सापडला.

ठाणे : काश्‍मीरमधून चरस या अमली पदार्थाच्या तस्करीचा प्रकार ताजा असताना पुन्हा ठाण्यात गांजाचा साठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. आंध्र प्रदेशातून ठाण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा तस्करांना ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. याप्रकरणी दोघा तस्करांकडून एक लाख किमतीचा साडेसहा किलो गांजा हस्तगत केला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

ठाण्यातील रेल्वेस्थानक परिसरात काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थविरोधी पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातील ओम साई बेल्ट या दुकानाच्या समोरून दोघा संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्या वेळी त्यांच्याकडे सॅकमध्ये लपवलेला एक लाख एक हजार किमतीचा साडेसहा किलो गांजा सापडला.

याप्रकरणी रिक्षाचालक व्हिक्‍टर राजू जोसेफ एम (वय 47) व फेरीवाला बल्ला अण्णाजी विरा बदरराव (32) यांना अटक केली. हे दोघे विशाखापट्टणम्‌ आंध्र प्रदेश राज्यातील राहणारे असून, तेथून त्यांनी गांजा ठाण्यात विक्रीसाठी आणला होता.

Web Title: Marathi News Mumbai News Thane Rikshaw Driver Arrested