सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी नियमाचे पालन करा - बाबाजी आव्हाड

रवींद्र खरात 
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

कल्याण : सुरक्षित आणि सुखकर प्रवास करण्यासाठी वाहनचालकाने पुढाकार घेतला पाहिजे, वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. चुका केल्यास, नियम मोडल्यास वाहतूक पोलीस कारवाई करतोच मात्र नागरीकांनी नियमाचे कसे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने कल्याण मध्ये आज ट्रॅफिक अवेरनेस प्रोग्रॅम आयोजित केला आहे अशी माहिती वाहतूक  सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी सकाळला दिली. 

कल्याण डोंबिवली शहरात लोकसंख्या वाढत आहे त्यासोबत वाहनांची संख्या दुप्पट वाढली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहे,  मात्र मनुष्यबळ कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहन चालकांनी नियमांचे पालन केल्यास काहीसा भार कमी होईल यासाठी वाहतूक पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती हाती घेण्यात आला आहे. 

आज सोमवारी (ता. 12) सायंकाळी 5 च्या सुमारास कल्याण पश्चिम दिपक हॉटेल समोर वाहतूक नियमांचे पालन करा यावर 25 जणांच्या पथकाने पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी वाहन चालविताना दारू पिऊ नये, हेल्मेट घाला, मोबाईल वर बोलू नका, सीट बेल्ट लावा, झेब्रा क्रॉसिंग अगोदर वाहन थांबवा नागरिकांना जाऊ द्या, याबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी जनतेशी संवाद साधत वाहतुकीचे धडे देत त्याचे फायदे तोटे सांगितले. तर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी ही मार्गदर्शन केले तद्नंतर सजावट केलेला ट्रक कल्याण मधील विविध चौकात नेऊन प्रबोधन करण्यात आले.

यावेळी माहिती देताना वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी सांगितले की नियम मोडले की वाहतूक पोलीस कारवाई करतो मात्र नियमांचे पालन केल्यास वाहन चालकांवर कारवाईच होणार नाही आणि वाहतूक कोंडी ही कमी होईल, पुढे वाहन थांबले असताना त्याला ओव्हरटेक करून रस्ता जाम केला जातो त्यामुळे अनेकांना त्रास होतो सर्वांना नियम आहेत त्याचे पालन केल्यास सुरक्षित आणि सुखकर प्रवास होऊ शकतो असे मत आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले.
 
Web Title: Marathi news mumbai news traffic rules awareness