उल्हासनगर पालिकेवर शिवसेनेचा टंबरेल मोर्चा

दिनेश गोगी
मंगळवार, 9 जानेवारी 2018

उल्हासनगर : एकीकडे अलीकडेच शाळांतील शौचालय टापटीपपणा बाबत केंद्र कमिटीने ज्या उल्हासनगर पालिकेला हागणदारी मुक्ततेचे प्रमाणपत्र दिले, त्याच उल्हासनगरात शौचालया अभावी चक्क शिवसेनेने टंबरेल मोर्चा काढल्याने स्वच्छ भारत अभियान यशस्वी की अयशस्वी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 पालिकेच्या हाकेच्या अंतरावर शिवशक्ती नगर आहे. या परिसरात पूर्वी महिलांसाठी सार्वजनिक शौचालये होती. मात्र ते तोडून त्याजागी समाजमंदिर बांधण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरच्या परिसरामध्ये शौचालयासाठी जावे लागते. याबाबत अनेकदा निवेदन दिल्यावरही पालिका त्याकडे कानाडोळा करत असल्याने अखेर आज शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शाखाप्रमुख विशाल जुनाडकर, महिला आघाडीच्या कविता ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी टंबरेल मोर्चा काढला. यावेळी रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव हे देखील उपस्थित होते. याबाबत शिष्टमंडळाने पालिकेचे मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांना निवेदन दिले. एका आठवड्यात शौचालय बांधणीचा निर्णय घेण्याचे आश्वासन देहरकर यांनी दिले. आम्ही आठवडाभर प्रतिक्षा करणार आणि तोपर्यंत शौचालय बांधून दिले नाही तर महिला पालिकेत शौचालयाला येतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

Web Title: Marathi news mumbai news ulhasnagar municipal corporation