कोमल हातांनी भरल्या रंगछटा आणि निर्जीव भिंती झाल्या सजीव

Dombivali Wall Painting
Dombivali Wall Painting

डोंबिवली : निर्जीव भिंती झाल्या सजीव हा अनुभव डोंबिवलीकरांना आनुभवायला मिळाला, निमित्त होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे आयोजित ‘भगवा सप्ताह’ अंतर्गत स्वच्छता मोहिमेचे. डोंबिवली रेल्वेस्थानक स्वच्छ करुन स्थानकातील व परिसरातील भिंतींवर भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळपासून शालेय विद्यार्थी भिंतीवर विविध संदेश देणारी सुंदर चित्रे रेखाटण्यात दंग होते. बेटी बचाओ, स्वच्छतेचे महत्व, पर्यावरण, पाणी वाचवा असे संदेश या चित्रातून देत होते. नागरिकही ते कौतुकाने बघत होते व विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते. डोंबिवलीतील 47 शाळांतील सुमारे तीनशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. 
शहरप्रमुख राजेश मोरे या संदर्भात माहिती देताना म्हणाले हिंदुहृदयसम्रट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त डोंबिवली शहर शाखेतफे 23 ते 29 पर्यंत विविध कार्यक्रमांचा सप्ताह साजरा करण्यात आला. 

शिवसेनाप्रमुख स्वत: कलाकार असल्याने व ते स्वच्छतेबाबत काटेकोर असल्याने स्टेशन परिसरातील भिंती स्वच्छ करुन त्यावर विविध सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळपासून विद्यार्थ्यांनी स्टेशनमधील व परिसरातील भिंती पांढरा रंग लावून स्वच्छ केल्या. त्यावर विविध जनजागृतीचे विषय देण्यात आले व त्याप्रमाणे स्वच्छता, पर्यावरण, बेटी बचाव यांचा संदेश देणारी चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देण्यात आली तसेच शिक्षकांचाही गौरव करणत आला. आजच्या या उपक्रमाने सप्ताहाची सांगता झाली असेही मोरे यांनी सांगितले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर संघटक तात्या माने, महिला संघटक मंगला सुळे, उपशहरप्रमुख व शिवसेनेचे परिवहन सदस्य संतोष चव्हाण व सतीश मोरे, विजय भोईर यांनी भरपूर मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com