लुटारू महिलेसह दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

मध्यरात्रीची वेळ असल्याने सूर्यदेवने रिक्षा थांबवली. तेव्हा बाजूला लपून बसलेले नाजोचे साथीदार तेथे आले. अल्ताफने खिशातून वस्तरा काढून सूर्यदेवच्या गळ्याला लावला. त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन अल्ताफ आणि नाजो संतोषनगरच्या दिशेने पळू लागले. 

मुंबई : रात्रीच्या वेळेस रिक्षाचालकांना लुबाडणाऱ्या टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला. अल्ताफ हनिफ शेख आणि नाजो अल्लारखा अन्सारी अशी त्या दोघांची नावे आहेत. अल्ताफविरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. 

उपनगरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस टॅक्‍सी, रिक्षाचालकांना लुटण्याचे प्रकार सुरू होते. शनिवारी (ता. 10) पहाटे सूर्यदेव सिंग हे रिक्षाचालक गोरेगावच्या संतोषनगर परिसरात आले. तेव्हा नाजोने हात दाखवून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सूर्यदेवने रिक्षा थांबवली. तेव्हा बाजूला लपून बसलेले नाजोचे साथीदार तेथे आले. अल्ताफने खिशातून वस्तरा काढून सूर्यदेवच्या गळ्याला लावला. त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन अल्ताफ आणि नाजो संतोषनगरच्या दिशेने पळू लागले. 

दिंडोशी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विजय जाधव गस्तीवर होते. सूर्यदेवने घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पाठलाग करून अल्ताफ आणि नाजोला ताब्यात घेतले. त्या दोघांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. नाजोला दिंडोशी पोलिसांनी हद्दपार केले होते. तिच्याविरोधात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत; तर अल्ताफविरोधातही आठ गुन्हे दाखल आहेत. 

Web Title: Marathi News Mumbai News Women Arrested with two Persons