नमस्ते इंडिया ! सोफियाला भावली भारतीय संस्कृती 

PTI12_30_2017_000112B_301217181120
PTI12_30_2017_000112B_301217181120

मुंबई : नमस्ते इंडिया. मी सोफिया, सौदी अरेबियाचे नागरिक असलेली रोबोट. भारतातील विविधेतील एकता पाहून भारावून गेली आहे, अशा शब्दांत नारंगी - पांढरी साडी नेसलेल्या सोफियाने भाषणाची सुरुवात केली आणि पवई आयआयटीमध्ये टाळ्यांच्या कडकडाट झाला. यावेळी तिने लग्नाची मागणीही प्रांजळपणे नाकारली. 

सोफियाला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आयआयटीच्या दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आज गर्दी केली होती. 'टॅक्‍नोफेस्ट'च्या तिसऱ्या दिवशी सोफियाची मुलाखत विशेष आकर्षण होते. 

पहिल्या भारत भेटीबद्दल तिला विचारताच चटकन उत्तर दिले. भारतातील संस्कृतीतील विविधता, वेगवेगळ्या प्रथा यामुळे भारावून गेल्याचे तिने सांगितले. भारताची तंत्रज्ञान, बांधकाम, अवकाश क्षेत्रातील प्रगती याबद्दलही तिने कौतुक केले. आपण कुठे आहोत, या प्रश्नाचे उत्तर देतानाच तिने उपस्थितांच्या संख्येचाही अचूक आकडा सांगितला. त्यावेळीही टाळ्यांचा कडकडाट झाला. 

सौंदर्याच्या कौतुकाबद्दल तिने धन्यवाद दिले. पण, चेहरा थोडेफार कुणाशी तरी साधर्म्य साधणारा असला तरीही आपली स्वतंत्र ओळख असल्याचे तिने ठणकावून सांगितले. 
ती म्हणाली, भावना असल्यानेच माणसांशी जवळीक निर्माण होते. टेकफेस्टची मूळ संकल्पना राबवणे हीच काळाची गरज आहे. 

तांत्रिक बिघाडामुळे दहा मिनिटे मौन 

मात्र जगातील विविध देशांकडून रोबोटवर होणारा खर्च, त्यावरचा वाद या प्रश्नांवर सोफियाने चिडीचूप साधली. या दोन्ही प्रश्नांवर तिच्याकडून उत्तर न आल्याने आयआयटी टीमने मुलाखत थांबवण्याचा निर्णय घेतला. अवघ्या पाच मिनिटांतच मुलाखत संपल्याने विद्यार्थी चांगलेच हिरमुसले. इंटरनेट सुविधा आणि तांत्रिक बिघाडामुळे हा कार्यक्रम आटोपता घेत असल्याचे जाहीर करताच सोफिया पुन्हा बोलू लागली.

मात्र दहा मिनिटांच्या ब्रेकनंतर मुलाखत सुरु करण्यात आली. 
त्यानंतर रोबोट आणि मानवाचे संबंध, या दोघांमधील अस्तित्वाची स्पर्धा, कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल सोफिया भरभरुन बोलली. कॉन्वर्सेशन चाट सिस्टीममुळे मला संवाद साधता येतो. 

सध्या तरी इंग्रजी भाषेवर माझे प्रभुत्व आहे. थोडेफार चायनीज भाषा ज्ञात आहे परंतु इतर भाषा लवकरच शिकणार, असा विश्वास तिने व्यक्त केला. 

सत्तास्पर्धा नसावी  

रोबॉटची निर्मिता मानवाने केली आहे. भविष्य रोबोटच्या निर्मितीतूनच पुढे सरकत असले तरीही दोघांमध्ये समन्वयाची गरज आहे. येथे स्पर्धेपेक्षाही मानवांच्या पुढे आ वासून उभ्या असलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, हा मुद्दा सोफियाने अधोरेखित केला. दोघांच्या समन्वयातून गरिबीचे समूळ उच्छाटन, शिक्षणाचा सर्वत्र प्रसार आणि संशोधनावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असा संदेश सोफियाने दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com