नेहरूंचे आर्थिक धोरण चुकले; खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची आर्थिक अधोगती झाली. अशी टिका करतानाच सर्जिकल स्ट्राईक थांबवून आता पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची वेळ आली आहे. असे मत भाजप नेते, खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. 
माटूंगा येथील विरमाता जिजाबाई भोसले महाविद्यालयात टेक्‍नोव्हेंझा कार्यक्रमात डॉ.स्वामी बोलत होते.

मुंबई - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची आर्थिक अधोगती झाली. अशी टिका करतानाच सर्जिकल स्ट्राईक थांबवून आता पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची वेळ आली आहे. असे मत भाजप नेते, खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. 
माटूंगा येथील विरमाता जिजाबाई भोसले महाविद्यालयात टेक्‍नोव्हेंझा कार्यक्रमात डॉ.स्वामी बोलत होते.

स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरु यांनी रशिया प्रमाणे कृषीप्रधान धोरण स्विकारले. मात्र, ब्रिटीशांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेतल्या होत्या. तसेच देशात जमिनदारी पध्दतही पसरलेली होती. त्यामुळे देशाला अन्न टंचाईला सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असा दावा डॉ. स्वामी यांनी केला. नेहरु यांच्या धोरणावर टिका करतानाच त्यांनी दिवंगत पंतप्रधान लाल बहादूश शास्त्री यांचे कौतुक केले. शास्त्री यांनी सुरु केलेल्या हरीतक्रांती मुळेच देशाची अर्थव्यवस्था सुधारली असा दावाही त्यांनी केला. शेती क्षेत्रात अजुन प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी असेही त्यांनी नमुद केले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना सर्जिकल स्ट्राईक बद्दल विचारले असता 'लहान मोठे सर्जिकल स्ट्राईक थांबवून आता थेट पाकिस्तानाला नेस्तनाबूत करण्याची वेळ आली आहे' असे त्यांनी नमुद केले. पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्‍शन टिमने केलेल्या छुप्या हल्यात चार भारतीय जवान काही दिवसांपुर्वी शहिद झाले होते. त्याचा बदला म्हणून आज भारतीय जवानांनी काश्‍मिर मधील नियंत्रण रेषा ओलांडून तीन पाकिस्तानी जवानांनी मारले असल्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्‍वभुमीवर त्यांना हा प्रश्‍न विचारण्यात आला होता. 

आयकर बंद करायला हवा. -
भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. या भारतीय तरुणांच्या ताकदीवर अमेरीकेने संगणकात क्रांती केली. अमेरीका संशोधनावर आणि नवनिर्मीतीवर भर देते. मात्र, हे आव्हान भारत स्विकारत नाही. अमेरीका आणि चीनमध्ये शिक्षणासाठी भारतापेक्षा दुप्पट गुंतवणुक होते. भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी शिक्षणातील गुंतवणुक वाढवून तरुणांमध्ये उद्योजकता वाढवायला हवी असे मतही डॉ. स्वामी यांनी नमुद केले. भारताची आयकर पध्दतीही बंद करायला हवी असेही त्यांनी नमुद केले. 

Web Title: Marathi News Neharu Financial policy Subrahmanyam Swami