कल्याणमध्ये 'एक पेन, एक वही' उपक्रमाला चांगला प्रतिसाद

रविंद्र खरात
बुधवार, 6 डिसेंबर 2017

कल्याण : महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी फुल, अगरबत्ती, मेणबत्ती न आणता एसटी कर्मचारी वर्गाने 'एक पेन, एक वही' आणावी असे आवाहन केले होते, एसटी कर्मचारी वर्गाच्या एक पेन एक वही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यात तब्बल 34 डझन वही पेनाचे आज बुधवारी (ता. 6) कल्याण पूर्व मधील मातोश्री रखमाबाई गायकवाड़ विद्यालयामधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आबेंडकरांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण एसटी आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज गवळी, राजु पिंपळे, योगेश कांबळे आर. यु. भादवे, प्रमोद पिसाळ, जोगदंड, आर. आर. जोगी, मनिष म्हात्रे आदींनी मेहनत घेतली. 

Web Title: Marathi news one pen one book campaign successful at kalyan