मोखाड्यात काही काळ रास्तारोको

भगवान खैरनार
बुधवार, 3 जानेवारी 2018

मोखाडा : कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर त्याचे राज्यभर हिंसक पडसाद उमटले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मोखाड्यात जव्हार फाटा चौफुलीवर आणि खोडाळ्यात शिवाजी चौकात काही काळ भीमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर, बाजारपेठा सुरळीत सुरू राहील्या आहेत. कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. आज भारीप सह अन्य संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मोखाड्यात भीमसैनिकांनी जव्हार फाटा चौफुलीवर तर खोडाळ्यातील शिवाजी चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करीत कोरेगाव भीमा घटनेचा शांततेत निषेध केला आहे.

मोखाडा : कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर त्याचे राज्यभर हिंसक पडसाद उमटले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मोखाड्यात जव्हार फाटा चौफुलीवर आणि खोडाळ्यात शिवाजी चौकात काही काळ भीमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर, बाजारपेठा सुरळीत सुरू राहील्या आहेत. कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. आज भारीप सह अन्य संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मोखाड्यात भीमसैनिकांनी जव्हार फाटा चौफुलीवर तर खोडाळ्यातील शिवाजी चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करीत कोरेगाव भीमा घटनेचा शांततेत निषेध केला आहे. या आंदोलना मुळे काही काळ वाहतूक कोंडी ही झाली होती. 

मात्र, आदिवासी भागातील परिस्थितीची जाणीव ठेवीत भीमसैनिकांनी घटनेचा निषेध नोंदवून आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे मोखाड्यातील सर्व बाजारपेठा आणि वाहतूक सुरळीत सुरू राहील्या आहेत. 

Web Title: Marathi news palghar news rastaroko in mokhada