पालघर - महिला दिनी पालघरमध्ये रंगल्या महिला क्रिकेट स्पर्धा 

प्रमोद पाटील 
शुक्रवार, 9 मार्च 2018

सफाळे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस स्टेशन, साईविराज महिला क्रिकेट कमिटी व सकाळ  तनिष्का ग्रुप ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील आर्यन हायस्कूल च्या मैदानावर गुरुवारी (ता. 8) पालघर महिला क्रिकेट चषक 2018 चे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. 

सफाळे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस स्टेशन, साईविराज महिला क्रिकेट कमिटी व सकाळ  तनिष्का ग्रुप ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील आर्यन हायस्कूल च्या मैदानावर गुरुवारी (ता. 8) पालघर महिला क्रिकेट चषक 2018 चे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेचे उद्घाटन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंगे यांनी महिला दिनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच लाभदायक ठरतील अशी अपेक्षा बाळगून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच   प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या पालघर नगरपालिकेचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेच्या महिला- बाल कल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी आदींनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. 

एकदिवसीय झालेल्या या स्पर्धेत जय भवानी पास्थळ संघाने उमरोळीच्या जिजाऊ संघाला पराभूत करून प्रथम पारितोषिक पटकावले. तर नांदगाव येथील स्वामी समर्थ संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. वुमन ऑफ द मॅच आणि  वुमन ऑफ द सिरिजची मानकरी जय भवानी पास्थळ संघाची कुसुम ठरली.  तिने  95 धावा आणि 4 विकेट घेतले. बेस्ट गोलंदाज ची मानकरी जिजाऊ फायटर उमरोळीची स्वाती तर व बेस्ट फलंदाज म्हणून जय भवानी पास्थळची रागिणी ठरली. या  स्पर्धेत पालघर तालुक्यातील सोळा महिलांचे संघ सहभागी झाले होते. रणरणत्या उन्हात ही अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी महिलांना या स्पर्धेतून आपल्या अंगी असलेले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. आई-आणि मुलगी एकाच संघात खेळल्या बद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी पालघर जिल्हा उपविभागीय पोलिस अधिकारी निमित गोयल, आंतरराष्ट्रीय अॅथलिट स्नेहल राजपूत, पालघर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी, डाॅ.सचिन नवले आदी मान्यवर उपस्थितीत होते.

साईविराज महिला क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष डॉ. साईली भानुशाली यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक करताना महिलांच्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव देऊन त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असे सांगितले.  डाॅ. साईली यांच्या पुढाकाराने झालेल्या या महिला क्रिकेट चषकसाठी पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, क्रीडा मार्गदर्शक संतोष चुरी, सामाजिक कार्यकर्ते विशाल भानुशाली, पालघर तनिष्काच्या दिपा पामाळे,स्नेहल किणीकर , प्रफुल्लता पाटील , विनिता राऊत, प्रतिभा वैती, कमळाकर पाटील, पत्रकार निरज राऊत आदींचे विशेष सहकार्य लाभले. पालघर मध्ये प्रथमच झालेल्या या स्पर्धेला मोठा प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.  

Web Title: Marathi news palghar news women cricket match