पालघर "नॉट रीचेबल' कर थकबाकी; मोबाईल टॉवर सील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

जमीन महसूल कर व थकबाकीची रक्कम न भरल्याने पालघर महसूल विभागाने मोबाईल टॉवर सील करण्याचे सत्र सुरू केले आहे. पालघर तहसीलदारांनी शनिवारी 25 टॉवर सील केल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर पालघरमध्ये मोबाईल सेवा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. 

पालघर : जमीन महसूल कर व थकबाकीची रक्कम न भरल्याने पालघर महसूल विभागाने मोबाईल टॉवर सील करण्याचे सत्र सुरू केले आहे. पालघर तहसीलदारांनी शनिवारी 25 टॉवर सील केल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर पालघरमध्ये मोबाईल सेवा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. 

पालघरमध्ये प्रत्येक मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे सुमारे 40 त 50 मोबाईल टॉवर असून प्रत्येक मोबाईल टॉवरकडून प्रतिवर्षी 50 हजार इतका अनधिकृत अकृषिक वापराचा दंड आकारला जातो. अनेक वर्षांपासून त्याची थकबाकी आहे. रक्कम न भरल्याने पालघरचे तहसीलदार महेश सागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी रिलायन्स, आयडिया, ए.टी.पी, इंडस आदी नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांचे 25 टॉवर आज सील केले.

यामुळे तालुक्‍यातील मोबाईल सेवेवर उद्यापासून परिणाम होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शनिवारी काही भागांतील मोबाईल सेवेवर याचा परिणाम झाला आहे. 

 

Web Title: Marathi News Palghar Not Richable pending amount mobile tower seal