भिवंडीतले रस्ते झालेत मृत्यूचे सापळे, आणखी किती जणांना मुकावे लागणार प्राण ?

फैयाज शेख, भिवंडी
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

  • भिवंडीतले रस्ते झालेत मृत्यूचे सापळे.. 
  • खड्डेमय रस्ते घेतायत निष्पापांचे बळी
  • आणखी किती बळी गेल्यानंतर येणार प्रशासनाला जाग?

वाडा-भिवंडी रोडवर सुरू असलेला हा रास्ता रोको. वाडा भिवंडी रोडवर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे इथले नागरिक चांगलेच संतापलेत. कारण अवघ्या दोन दिवसांत या खड्डेमय रस्त्यांनी दोन बळी घेतलेत. रामप्रसाद गोस्वामी या 60 वर्षीय वृद्धाचा वाडा-भिवंडी रोडवर ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. रस्त्यावरचा खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रकनं त्यांना उडवलं.

त्या आधी दोनच दिवसांपूर्वी एका तरुण महिला डॉक्टरला या खड्डेमय रस्त्यांमुळे प्राणास मुकावं लागलं होतं. नेहा आलमगीर शेख नावाच्या या डॉक्टरचं लग्न अगदी एका महिन्यानं होणार होतं. भिवंडीतल्या रस्त्यांनी तिचा बळी घेतला..बाईकवरून परत येत असताना, बाईक खडड्यात आदळली आणि नेहा रस्त्यावर पडली. तिच्या मागून येणाऱ्या ट्रकनं तिला चिरडलं.

मनोर-वाडा-भिवंडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालीय. या रस्त्यामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेलेत तरी प्रशासनाला जाग येत नसल्याचा आरोप केला जातोय.

केवळ भिवंडीतीलच नाही तर राज्यातल्या बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालीय. या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात कित्येकांचे बळी जातायत. असे आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होईल, आणि हे रस्ते दुरुस्त करेल? हाच प्रश्न आता सगळेच विचारत आहेत.

WebTitle : marathi news roads in bhiwandi are turning to be death trap


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news roads in bhiwandi are turning to be death trap

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: