विंचू चावल्याने मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

शहापूर - आदिवासी आश्रमशाळेतील विराज घाटाळ या दहा वर्षीय मुलाचा विंचू चावल्याने आज (ता. 15) मृत्यू झाला. ही घटना शहापुरातील पिवळी गावानजीक घडली.

शहापूर - आदिवासी आश्रमशाळेतील विराज घाटाळ या दहा वर्षीय मुलाचा विंचू चावल्याने आज (ता. 15) मृत्यू झाला. ही घटना शहापुरातील पिवळी गावानजीक घडली.

पिवळी येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेत तिसरीत शिकणारा विराज सकाळी साडेआठ वाजता आश्रमशाळेत जात असताना त्याला विंचू चावला. त्याच्यावर वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्र व शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला ठाणे येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली.

Web Title: marathi news shahapur news boy death by Scorpion bite